शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजा येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:28 IST

ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षणासाठी शासनाकडुन दिल्या जाणारी शिष्यवृत्ती पुर्ववत चालू करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सिंदखेड राजा येथे मोर्चा काढण्यात आला.

सिंदखेडराजा : खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संवैधानिक आरक्षण ओबीसी विद्यार्थ्याकरीता १०० टक्के लागु करण्यात यावे, इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी भरण्याची व्यवस्था शासनाने करावी, नॉन क्रिमिलेअरची अट रदद करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षणासाठी शासनाकडुन दिल्या जाणारी शिष्यवृत्ती पुर्ववत चालू करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सिंदखेड राजा येथे मोर्चा काढण्यात आला.येथील नागपूर डाक लाईन आढाव गल्लीमधून सकाळी ११ वाजता ओबीसी आरक्षण बचाव समीतीच्या वतीने स्थानिक तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पाठविण्यात आले. खासगी विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असलेल्या सवर्ण सवंर्गाला आणि सामाजिक व आर्थीकदृष्टया दुर्बल घटक असलेल्या मराठा संवर्गाला हे आरक्षण १०० टक्के लागू करण्यात आले आहे. सर्वांना समान न्याय या तत्वानुसार सदर संवैधानिक आरक्षण ओबीसी प्रवर्गालाही शंभर टक्के लागू करण्यात यावे. केवळ ५० टक्के एवढेच मिळत आहे. तसेच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील खासगी विना अनुदानीत वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्क ३० ते ४० टक्क्यांनी अधिक आहे.राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी हे शुल्क भरण्यास आर्थीकदृष्टया सक्षम नाहीत. त्यामुळे इतर प्रवार्गाप्रमाणे ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची खासगी विना अनुदानीत महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्काची १०० टक्के परिपुर्ती शासनाने करावी. तर ओबीसीकरीता नॉन क्रिमिलेअरची मर्यादा आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात फी मध्ये ५० टक्के सवलत मिळत नाही. सर्व उन्नत गटातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमेलियरची अट रदद करण्यात यावी, ओबीसीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायीक प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत होती. पंरतु महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये कपात केल्याचे निवेदनात म्हटले आहे.यावेळी नगराध्यक्ष सतिश तायडे, छगनराव मेहेत्रे, भिवसन ठाकरे, योगेश म्हस्के, अतिश तायडे, शिवप्रसाद ठाकरे, अ‍ॅड. संदीप मेहेत्रे, बाबुराव खरात, राजेंद्र अंभोरे, लक्ष्मण आढाव, बबन आढाव, जगन ठाकरे, हरिचंद्र चौधरी, कैलास मेहेत्रे, शाम मेहेत्रे, नरहरी तायडे, बालु मेहेत्रे, राजेंद्र आढाव, बाळु म्हस्के, शाम तुकाराम मेहेत्रे, फकीरा जाधव, शेख शकील, शुभांगी मगर, शालिनी तिडके, अनिता मेहेत्रे, प्रतिभा मेहेत्रे, शारदा मेहेत्रे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पोलीस निरीक्षक अरुण आगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजाreservationआरक्षण