शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:23 IST

जमिनीखालील पाण्याची पातळी खालावलेली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या चिखली तालुक्यातील मेरा फाटा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून येणार्‍या काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे.

ठळक मुद्देमेरा फाटा गावाला टँकरद्वारे पाणी पुरवठा प्रशासनाचे नियोजन 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  यावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पामध्ये ३२ टक्के जलसाठा असून, जमिनीखालील पाण्याची पातळी खालावलेली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या चिखली तालुक्यातील मेरा फाटा येथे एक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून येणार्‍या काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे.जिल्ह्यात एकूण १२७२ गावे असून, अनेक गावात विविध प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यात येतो; मात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील विविध प्रकल्पामुळे २२.१७ टक्के जलसाठा असून दिवसे्दिवस हा जलसाठा खालावत आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम तोट्यात आला असून परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाचे नियोजन केले होते. त्यामुळे विविध प्रकल्पासह जमिनीखालील पाण्याची पातळी घटत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी पाणीटंचाईचा फटका बसून टंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या पाहता लोणार तालुक्यातील १७, मेहकर तालुक्यातील ६ तसेच जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात विंधनविहिरी घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.   याशिवाय महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ मधील कलम २५ नुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या अहवालाअन्वये जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई घोषित गावांमध्ये अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या ५00 मीटर अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील विहीर तात्पुरती बंद करून भूजल काढण्यासाठी, विहीत करण्यात येईल. कोणतीही व्यक्ती भूजल पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित करणार नाही, असे प्रशासनाचे आदेश आहेत.

रब्बी हंगामातील सिंचन क्षेत्र कमी होणारयावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्पात २२.१७ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षामध्ये यंदा सर्वात कमी जलसाठय़ाची नोंद करण्यात आली आहे. २१ सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २0१३ साली ४३६ दलघमी, २0१४ मध्ये ३५९ दलघमी, २0१५ मध्ये २६0 दलघमी जलसाठ्याची नोंद करण्यात आली होती. या तुलनेत यंदाच्या जलसाठा सर्वात कमी ११८ दलघमी आहे. त्यामुळे भविष्यात जलसंकट निर्माण होणार असून, यावर्षी रब्बी हंगामातील सिंचन क्षेत्र कमी होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी