शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कामे प्रलंबीत राहण्याचे प्रमाण शुन्यावर आणणार- दिनेश गिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 19:29 IST

Buldhana News बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून गेल्या १५ दिवसापूर्वी दिनेश गिते यांच्याशी केलेली बातचीत.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : बुलडाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून गेल्या १५ दिवसापूर्वी दिनेश गिते यांनी पदभार स्वीकारला. निवासी उपजिल्हाधिकारी या नावातच त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव होते. त्यानुषंगाने ते महसूल व अन्य विभागात नवीन काय करणार, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व विभागात समन्वय कसरा ठेवणार या संदर्भाने त्यांच्याशी केलेली बातचीत.

पदभार स्वीकारल्यानंतर आपण कोणत्या कामाला प्राधान्य दिले.?शुन्य टक्के कामे प्रलंबीत राहतील यास आपण प्राधान्य दिले आहे. त्यानुषंगाने सहकारी कर्मचारी, अधिकारी यांच्या समस्या जाणून घेवून प्रलंबीत कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्या मार्गदर्शनात आपण ही कामे करणार आहोत.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याही अनेक समस्या आहेत.?होय. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्याही समस्या आहे. त्यांच्या सेवा विषयक समस्या मार्गी लावण्यास प्राधान्य दिले आहे. या समस्या मार्गी लागल्यास कामाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

नवनवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी काय उपाययोजना आहे?काळानुरूप प्रशासकीय सेवेत काम करताना आपले ज्ञान वृद्धिंग करावे लागते. त्यानुषंगाने कोतवाल ते तहसिलदार पदापर्यंतच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठीी प्रशिक्षणाच्या माध्यमातून हा पर्याय उपलब्ध करणार आहोत.

 समन्वय समस्या आहे का?नाही. सर्वांच्या समन्वयातून गुणात्मक काम करण्यावर भर आहे. लोकप्रतिनिधी पासून सामान्यांच्या सुचनांचे अवलोकन करून प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासोबतच नागरिकांची कामे सहजतेने होतील यास प्राधान्य देणार आहोत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत?ऑक्टोबरमध्ये जिल्ह्यात चाचण्यांचा वेग वाढवून कोरोना संसर्गाचे प्रमाण अचूक काढण्यास त्यामुळे मदत होत आहे. तसेच यंत्रणा अधिक सक्रीय व गतिमान करण्यास आपण प्राधान्य दिल्याचे ते म्हणाले. एकट्या ऑक्टोबर महिन्यात जवळपास २० हजार चाचण्या जिल्ह्यात झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्याच्या विकासासाठी व्हीजन डॉक्युमेंटद्वारे प्रयत्न करणार

 महसूल विभागातील कोतवाल, तलाठी, कनिष्ठ लिपीक, मंडळ अधिकारी संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान वाढविण्यास प्राधान्य देणार आहोत. तसेच सर्व संवर्गातील कर्मचारी अधिकारी यांच्या सेवा विषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य देवू.कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी गुणात्मक दर्जाने करण्यासोबतच सर्व विभागाच्या समन्वयातून कामे प्रलंबीत राहणार नाहीत यासाठी प्राधान्याने प्रयत्न करून दुरवरून येणाऱ्यांचीही कामे तातडीने मार्गी लावणार- दिनेश गिते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत