शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बुलडाणा जिल्ह्यात रोहयोच्या कामांवर मजुरांची संख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 11:42 IST

Laborers on MNREGA's works decreased : जवळपास ४६ टक्केच मजूर रोजगार हमी योजनेच्या कामांवर हजर असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता रोजगार हमी योजनेच्या कामांवरही मजुरांची संख्या रोडावल्याचे जिल्ह्यात  चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ४६ टक्केच मजूर रोजगार हमी योजनेच्या कामांवर हजर असल्याचे चित्र आहे.बुलडाणा जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींपैकी ३२० ग्रामपंचायतींमध्ये सध्या रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. यात प्रामुख्याने घरकूल, वृक्षलागवड, रोपवाटिका आणि शोषखड्ड्यांची कामे सुरू आहेत. या कामावर जिल्ह्यात ४६५२ मजूर कार्यरत आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत जवळपास ९ हजार तर जून २०२० मध्ये १२ हजार मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत होते. त्या तुलनेत यावर्षी रोहयोच्या कामावर  निम्मे मजूर कामावर असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. त्यामुळे रोहयोच्या कामावर मजुरांची संख्या घडली असल्याचा अंदाज रोहयो विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान सध्या ३२० ग्रामपंचायतीमध्ये १०५९ कामे सुरू आहेत. जिल्हयात सध्या ४६५२ मजूर रोहयोच्या कामावर कार्यरत आहे. यामध्ये सर्वाधिक १०२२ मजूर हे संग्रामपूर तालुक्यात कार्यरत असून या तालुक्यात ५० पैकी ३५ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. त्यानंतर मेहकर तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींमध्ये ५७७ मजुरांना काम उपलब्ध करण्यात आले आहे. चिखली तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीमध्ये ५२२ कामे करण्यात येत आहेत. तुलनेने बुलडाणा तालुक्यात केवळ ९ ग्रामपंचायतींमध्ये ४७ कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे बुलडाणा तालुक्यात दररोज २०० च्या आसपास कोरोना बाधीत  रुग्ण आढळून  येत आहेत. त्याचा परिणामही रोहयोच्या कामांवर दिसून येत आहे. रोहयोतंर्गत कामे उपलब्ध असून मजुरांनी ग्रामपंचायतस्तरावर कामाची मागणी करावी, असे आवाहनही रोहयोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना