शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

शिदोरीगृहात शेतक-यांची संख्या रोडावली!

By admin | Updated: December 28, 2014 00:24 IST

अत्यल्प उत्पन्नाचा परिणाम : केवळ एक रुपयात मिळते जेवन.

नाना हिवराळे / खामगाव ( बुलडाणा)खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल विक्रीस आणणार्‍या शेतकर्‍यांसाठी बाजार समितीने शिदोरीगृहाची व्यवस्था केली असून, येथे शेतकर्‍यांना केवळ १ रुपयात जेवन मिळते; मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन अत्यल्प उत्पन्न झाल्याने शिदोरीगृहात जेवनासाठी येणार्‍या शेतकर्‍यांची संख्या ५0 टक्क्यांनी रोडावली आहे.अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून समाजात अनेकजण अन्नदान करीत असतात. शेतकरी हा सर्वांचा पोशिंदा समजला जातो. शेतकरी सुखी तर जग सुखी, असेही म्हटले जाते. वर्षभर शेतात मेहनत करुन शेतमाल विकून आपला जीवनगाडा शेतकरी ओढत आहेत. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीस आणताना शेतकर्‍यांना जेवनाची सेवा देता यावी, या उदात्त हेतूने खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या पुढाकाराने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात स्व.सुलोचनादेवी सानंदा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिदोरीगृह उभारण्यात आले.१४ ऑगस्ट २0१३ पासून सुरु झालेल्या या शिदोरीगृहात शेतकर्‍यांची दररोज मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. वरण, भात, पोळी व भाजी असे जेवन दिल्या जाते, तर गुरुवारी गोड पदार्थ बनविल्या जातात. गतवर्षी दररोज ४00 ते ५00 दरम्यान शेतकरी जेवनासाठी येत असत; मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थितीने शेतकर्‍यांजवळ शेतमालच विक्रीसाठी नाही. एकरी एक ते दीड पोते सोयाबीन झडती झाली आहे, तर उडीद, मूग, ज्वारी, तीळ व मका ही पिकेही नगण्य स्वरुपात आली आहेत. परिणामी बाजार समितीत येणार्‍या शेतकर्‍यांची संख्या ५0 टक्क्यांनी घसरली आहे. शिदोरीगृहात सद्यस्थितीत केवळ १२५ ते १५0 पर्यंत शेतकरी जेवनासाठी येत आहेत. एक रुपयात जेवन असतानाही शेतकर्‍यांची संख्या घटली असल्याने यापुढील दिवस शेतकर्‍यांसाठी कठीण जाण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.बाजार समितीच्यावतीने शेतकर्‍यांसाठी एक रुपयात शिदोरीगृहात जेवनाची व्यवस्था केली आहे. ज्या शेतकर्‍यांना जेवनाचे कुपन संबंधितांकडून मिळत नसेल त्यांनी बाजार समितीकडे तक्रार करण्याचं अवाहन खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एम.एन.भिसे यांनी केले आहे.