शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दीड हजाराच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:02 IST

जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दीड हजाराच्या टप्प्यात आली असून एकूण बाधीतांची संख्या सध्या एक हजार ४९९ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दीड हजाराच्या टप्प्यात आली असून एकूण बाधीतांची संख्या सध्या एक हजार ४९९ झाली आहे. दरम्यान, रविवारी ५१ जण कोरोना बाधीत आढळून आले तर ३०१ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.प्रयोगशाळा आणि व रॅपीड टेस्टचे एकूण ३५८ अहवाल रविवारी प्राप्त झाले. त्यापैकी ३०७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालापैकी ४३ व रॅपीड टेस्टमधील आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णामध्ये बुलडाणा येथील चार, चांडोळ येथील एक, देऊळगाव राजा येथील एक महिला, लोणारमधील दोन, खामगावमधील ११, शेगावात एक, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे ही एक, चांदुरबिस्वा येथे आठ, धानोरा खुर्द येथे पाच, नांदुरा शहरात आठ, मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे एक महिला, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे एक व्यक्ती, मोताला तालुक्यातील बोराखेडी येथे एक पुरुष, संग्रामपूर तालुक्यातील बावणबीर येथे दोन, वरवट बकाल येथे एक तर सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथेही एक जण पॉझिटिव्ह आला आहे. चिखली तालुक्यातील दिवठाणा येथे एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, मुळची जालना जिल्ह्यातील पारध येथील रहिवासी असलेली एक संदिग्ध महिलाही बुलडाणा येथे कोरोना बादीत आढळून आली आहे. एकूण ५१ जण रविवारी कोरोना बाधीत आढळून आले आहेत.दुसरकीडे २१ रुग्णांनी रविवारी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये नांदुरा येथील दोन, देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथील एक महिला, लोणार येथील एक व्यक्ती, बुलडाणा तालुक्यातील धाड येथीलही ेक व्यक्ती, दिवठाण्यातील एक महिला, चिखली शहरातील एक आणि तालुक्यातीचल ब्रम्हपुरी येथील एक जण कोरोना मुक्त जाला आहे. दरम्यान, लोणार तालुक्यातील सुतलानपूर येथील सुलतानपूर येथील चार पुरुष, एक महिला, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील एक महिला तर खामगाव शहरातील चार, मेहकरमधील एक आणि सिंदखे राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील एक पुरुष तर मोताला तालुक्यातील खरबडी येथील एका व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे.आतापर्यंत संदिग्ध रुग्णांपैकी नऊ हजार ५२९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून कोरोना बाधीत रुग्णांपैकी ८५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.अद्यापही १९१ रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. वर्तमान स्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार ३९९ वर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या झाली आहे. पैकी ५१८ कोरोना बाधीतांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दुसरीकडे आतापर्यंत जिल्ह्यात ३० कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असून हे प्रमाण एकूण बाधीतांची संख्या पाहता अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या