शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

आता ‘शिवशाही’तही आवडेल तेथे प्रवास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:51 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही ही वातानुकूलीत बस सेवा महाराष्ट्रभर विविध आगारांमधून सुरू केली आहे. महामंडळातर्फे राबविण्यात येणार्‍या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’  या  योजनेंतर्गत पासधारकांनासुद्धा आता शिवशाही या बससेवेचा लाभ घेता येणार आहे. ही पास शिवशाही आसनी बससेवेसाठी ग्राह्य असून, जिल्ह्यात या पासचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात पासचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू शिवशाही आसनी बससेवेसाठी ग्राह्य

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शिवशाही ही वातानुकूलीत बस सेवा महाराष्ट्रभर विविध आगारांमधून सुरू केली आहे. महामंडळातर्फे राबविण्यात येणार्‍या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’  या  योजनेंतर्गत पासधारकांनासुद्धा आता शिवशाही या बससेवेचा लाभ घेता येणार आहे. ही पास शिवशाही आसनी बससेवेसाठी ग्राह्य असून, जिल्ह्यात या पासचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवतंत्रज्ञानाच्या युगात एसटीनेही कात टाकली असून, प्रवाशांना दज्रेदार सुविधा देण्यासाठी वातानुकूलीत शिवशाही ही बस महाराष्ट्राच्या अनेक आगारांमधून सुरू करण्यात आल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून वायफाय, सीसी टीव्ही आणि स्लीपर कोचच्या सुविधायुक्त व वातानुकूलीत शिवशाही बससेवा प्रवाशांना किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी परिवहन महामंडळाकडून ‘आवडेल तेथे   कोठेही प्रवास’ ही योजना राबविण्यात येते. यामध्ये सात किंवा चार  दिवसांची पास काढून प्रवाशांना प्रवास करता येतो. आता शिवशाही या बससेवेमध्ये ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेंतर्गत प्रवाशांना पास देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात ५ डिसेंबरपासून सुरू झाली असून, सात दिवसांची पास व चार दिवसांची पास अशा दोन प्रकारच्या पास सेवेचा लाभ प्रवाशांना देण्यात येत आहे.  ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेंतर्गत शिवशाही बससाठी देण्यात येणारी पास ही शिवशाही आसनी बससाठीच ग्राह्य ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शिवशाही शयन बससेवेतून या पासवर प्रवास करता येणार नाही, तसेच नवीन पासेस उपलब्ध होईपर्यंत सध्या वापरात असलेल्या निमआराम बससेवेच्या पासच्या मूल्यात रबरी शिक्क्याने मूल्य परिवर्तन करून ही पास दिल्या जाणार आहे. ही पास साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, मिडीबस, निमआराम या निम्न दर्जाच्या बससेवेसाठी वैध राहील, तसेच आंतरराज्य मार्गावरील पास राज्यातसुद्धा वैध राहील.  गर्दीचा हंगाम व कमी गर्दीचा हंगाम याचे मूल्य वेगवेगळे ठेवण्यात आले असून, १५ ऑक्टोबर ते १४ जून हा गर्दीचा हंगाम समजला जातो. तर १५ जून ते १४ ऑक्टोबर कमी गर्दीचा हंगाम समजला जातो. त्यानुसार पासचे मूल्य ठेवण्यात आले आहे. 

पाच रुपये अपघात सहाय्यता निधीशिवशाही बसच्या पासचे मूल्याव्यतिरिक्त प्रतिपास ५ रुपये अपघात सहाय्यता निधीची आकारणी करण्यात येणार आहे. मॅन्युअल पासांवर अपघात सहाय्यता निधी ५ रुपये असा रबरी शिक्का ठळकपणे उमटविण्यात येणार आहे. मुलांच्या पासचे दर हे पाच वर्षांपेक्षा जास्त व १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहेत. 

सात दिवसांच्या पासचे मूल्यगर्दी हंगामात प्रौढ प्रवाशांसाठी १७८0 व मुलांसाठी ८९0 रुपये. कमी गर्दी हंगामात प्रौढसाठी १६४५ व मुलांसाठी ८२५ रुपये आहे. आंतरराज्य मार्गासाठी गर्दी हंगामात प्रौढ १९२0 व मुले ९६0 रुपये. तर कमी गर्दी हंगामात प्रौढ १७८0 व मुलांसाठी ८९0 रुपये आहे. 

चार दिवसांच्या पासचे मूल्य गर्दी हंगामात प्रौढ प्रवाशांसाठी १0२0 व मुलांसाठी ५१0 रुपये. कमी गर्दी हंगामात ९४0 व मुलांसाठी ४७0 रुपये आहे. आंतरराज्य मार्गगर्दी हंगामात प्रौढ ११00 व मुले ५५0 रुपये. तर कमी गर्दी हंगामात प्रौढ १0२0 व मुलांसाठी ५१0 रुपये आहे. 

‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’  या योजनेंतर्गत शिवशाही बससेवेसाठी पास उपलब्ध करून देण्याच्या सूचना परिवहन महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत. त्यानुसार शिवशाही बसच्या प्रवासासाठी पासचा लाभ देण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. - ए.यू. कच्छवे,विभागीय वाहतूक अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीbuldhana bus standबुलडाणा बस स्टॅन्ड