शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मका साठवणुकीसाठी आता खासगी गोदामांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 11:58 IST

Buldhana News मका खरेदीमध्ये गोदामे कमी पडल्यास खासगी गोेदामांचा आधार घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयंदा मका उत्पादनही चांगले झाले आहे.मका हमीभावाने विक्री होण्याचे संकेत दिसून येत आहेत. 

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पश्चिम विदर्भात यंदा खरीप हंगामामध्ये ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पीक घेण्यात आले होते. त्यामुळे यंदा मका उत्पादनही चांगले झाले आहे. सध्या हमीभावाने मका खरेदी राज्यभर सुरू झाली आहे. दरम्यान, मका खरेदीमध्ये गोदामे कमी पडल्यास खासगी गोेदामांचा आधार घेण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा सर्व शेतकऱ्यांची मका हमीभावाने विक्री होण्याचे संकेत दिसून येत आहेत.  हमीभावाने शेतमाल खरेदी करताना, गोदामाची कमतरता, बारदाण्याचा अभाव यासारख्या अनेक अडचणी समोर येतात. त्यामुळे अनेक वेळा खरेदी प्रक्रिया बंद होते. शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतरही मका खरेदी होऊ शकत नाही; परंतु हमीभावाने भरड धान्य खरेदी करण्यासाठी गोदामे कमी पडल्यास आता खासगी गोदामे घेण्याच्या सूचना बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक मका उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळण्याची आशा लागली आहे. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सर्वत्र भरडधान्य खरेदी करण्यात येत आहे.यामध्ये मका, ज्वारी आदींचा समावेश आहे. मक्याचे उत्पादन पश्चिम विदर्भात ४४ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर झालेले आहे. नोंदणी केलेल्या पूर्ण शेतकऱ्यांचा ज्या धान्यासाठी नोंदणी केलेली आहे, ते धान्य खरेदी करावे, अशा सूचना डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ११ डिसेंबर रोजी बुलडाण्यात दिल्या. त्यामुळे मका उत्पादकांना आता दिलासा मिळाला आहे. मक्यासाठी गोदामे कमी पडत असल्यास खासगी गोदामे घेण्यात येणार असून, नियमानुसार खासगी गोदामे आवश्यकता वाटल्यास अधिग्रहित करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता सर्वच शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी होणार असल्याचे संकेत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहेत. 

बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक मकाअमरावती विभागामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक मका उत्पादन झाले आहे. अमरावती विभागामध्ये खरीप हंगामात एकूण नियोजनापैकी सुमारे १४२ टक्के क्षेत्रावर यंदा मका लागवड झाली होती. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात २८ हजार ३०२ हेक्टर, अकोला २५० हेक्टर, वाशिम २१७ हेक्टर, अमरावती १४ हजार ६४१ हेक्टर आणि यवतमाळ जिल्ह्यात ९५१ हेक्टर क्षेत्रावर मका उत्पादन घेण्यात आले. आतापर्यंत राज्यात बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक मका खरेदी झालेली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी