शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

उडीद खरेदी घोटाळ्य़ात ३२ जणांना नोटीस; बुलडाणा तालुक्यातही घोटाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:29 IST

बुलडाणा : चिखली तालुक्याप्रमाणे बुलडाणा तालुक्यातही उडीद खरेदी घोटाळा झाल्याचे समोर येत असून सहकार विभागाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत बुलडाण्यातही या घोटाळ्य़ाची चौकशी सुरू झाली आहे. त्यांतर्गत तब्बल ३२ जणांना बुलडाणा तालुका उपनिबंधकांनी नोटीस बजावल्या असून, ९ फेब्रुवारीला या प्रकरणात सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देया प्रकरणात ९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चिखली तालुक्याप्रमाणे बुलडाणा तालुक्यातही उडीद खरेदी घोटाळा झाल्याचे समोर येत असून सहकार विभागाने नियुक्त केलेल्या समितीमार्फत बुलडाण्यातही या घोटाळ्य़ाची चौकशी सुरू झाली आहे. त्यांतर्गत तब्बल ३२ जणांना बुलडाणा तालुका उपनिबंधकांनी नोटीस बजावल्या असून, ९ फेब्रुवारीला या प्रकरणात सुनावणी होणार आहे.दुसरीकडे याच प्रकरणात प्रारंभी नोटीस बजावलेल्या तीन जणांची चौकशी समितीने केली आहे. प्रसंगी या प्रकरणात लवकरच पोलिसांत गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा विशेष लेखा परीक्षक दीपक जाधव आणि बुलडाण्याचे सहायक निबंधक अविनाश सांगळे यांच्या त्रिसदस्यीय समितीमार्फत सध्या या प्रकरणाची चौकशी होत आहे.उडीद उत्पादक शेतकर्‍यांची लूट करत नाफेडच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून काही व्यापार्‍यांनी बनावट शेतकरी दाखवत उडीद खरेदीत लाखो रुपयांचा घोटाळा केल्याची शक्यता आहे. तसे आरोपही असून, यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारीही झाल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हा उपनिबंधकांनी ही तीन सदस्यीय समिती नियुक्त केली होती. चिखली तालुक्या पाठोपाठ बुलडाणा तालुक्यातही असा घोटाळा झाला असल्याची चर्चा आता असून, त्यानुषंगानेच ही नोटीस ३२ जणांना सध्या बजावण्यात आली आहे. प्रारंभीचे तीन मिळून एकूण ३५ जणांना ही नोटीस बजावली गेली आहे. आणखी काही जणांना प्रकरणात नोटीस बजावल्या जाण्याची शक्यता आहे.बुधवारी या प्रकरणात तिघांची चौकशी झाली असून, उर्वरित ३२ जणांची आता ९ फेब्रुवारीला चौकशी होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात बाजार समित्यांनाही प्रारंभी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. बीजोत्पादक कंपन्यांकडूनही प्रकरणात माहिती मागविण्यात आली होती. उडीद खरेदीदरम्यान उत्पादीत उडीद आणि प्रत्यक्ष खरेदी केलेला उडीद यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यानंतर हे प्रकरण प्रकर्षाने समोर आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा