शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके प्रकरणात स्वारस्य नाही! ‘बुलडाणा अर्बन’ने केली भूमिका स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:41 IST

बुलडाणा : छोट्या गुंतवणूकदारांना वाचविण्यासाठी बुलडाणा अर्बनने काही अटी व शर्थींच्या आधारावर १00 कोटी रुपयांपर्यंत पुण्याचे व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती; परंतु आता त्यांना अटक झाल्याच्या पृष्ठभूमीवर फंडींग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी स्पष्ट केली.

ठळक मुद्देबुलडाणा अर्बनने काही अटी व शर्थींच्या आधारावर डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना मदत करण्याची भूमिका घेतली होतीडीएसकेंना अटक झाल्याच्या पृष्ठभूमीवर, त्यांना फंडींग न करण्याची भूमिका बुलडाणा अर्बन ने घेतली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : छोट्या गुंतवणूकदारांना वाचविण्यासाठी बुलडाणा अर्बनने काही अटी व शर्थींच्या आधारावर १00 कोटी रुपयांपर्यंत पुण्याचे व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती; परंतु आता त्यांना अटक झाल्याच्या पृष्ठभूमीवर फंडींग करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी स्पष्ट केली.

गुंतवणूकदारांची २३0 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याच्या प्रकरणात डी. एस. कुलकर्णी यांना दिल्लीमध्ये शनिवारी पहाटे अटक करण्यात आली होती. या प्रकरणात प्रारंभी डीएसकेंना अटकेपासून संरक्षण दिले होते; मात्र शुक्रवारी न्यायालयाने ते काढून घेतले होते. त्यापूर्वी आर्थिक अडचणीत आलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या मदतीसाठी बुलडाणा अर्बन धावली होती. बुलडाणा अर्बनच्या संचालक मंडळाने डीएसकेंची मालमत्ता खरेदी करण्याची तयारी उच्च न्यायालयात दाखवली होती; परंतु सर्व मालमत्तांवर कर्जे असून, त्या बोजाविरहीत नसल्याचेही लक्षात आले होते. त्यातच शनिवारी डी. एस. कुलकर्णी यांना अटक झाल्याने या प्रकरणात ड्यू डिलीजनचा विषयच राहत नाही. वास्तविक काही अटी व शर्थींच्या आधारावर न्यायालयाच्या आदेशाने आम्ही मदत करणार होतो; मात्र डीएसके या विषयात बुलडाणा अर्बनला स्वारस्य राहलेले नाही. हा विषय बुलडाणा अर्बनच्या दृष्टीने संपुष्टात आला असल्याचे डॉ. सुकेश झंवर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीbuldhanaबुलडाणाbankबँक