शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीची तयारीही नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 16:00 IST

कापूस खरेदीबाबत जिल्हा प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचा प्रकार घडत आहे. 

खामगाव : चालू वषार्त शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाचे चुकारे वेळेत मिळावे, यासाठी ऑक्टोबरपूर्वि नोंदणी करून खरेदी सुरू करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये नोंदणीही सुरू झालेली नाही तर जिल्हा प्रशासनाकडे कापूस खरेदीची कोणती केंद्र राहतील, याची माहितीही अद्याप पोहचली नसल्याची माहिती आहे. चालू वर्षात कापूस विक्री प्रक्रीया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आॅक्टोबरपूर्वीच नोंदणी केल्याने (भारतीय कापूस महामंडळ) सीसीआयकडून खरेदी प्रक्रीयेला सुरूवात करण्याचे ठरले आहे.  बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची  नोंदणी होणार करण्यासाठी आँनलाइन किंवा आँफलाइन प्रक्रीया सुरू करण्याची जबाबदारी बाजार समित्यांची आहे. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचा प्रकार गेल्या १५ दिवसांपासून घडत आहे.  आधारभूत किंमतीमध्ये वाढ झाल्याने सीसीआयला किमान आधारभूत किंमत योजनेखाली मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करावी लागणार आहे. घाटाखालील तालुक्यांमध्ये कापसाचा पेरा बऱ्याप्ौकी  असल्याने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. कापूस विक्रीसाठी महाराष्ट्र कापूस पणन महासंघ किंवा सीसीआयला विक्री करण्यासाठी नोंदणीची पद्धत गेल्या काही वर्षात पुढे आली आहे. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होणे, तसेच उशिरा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागणे, यासारखे प्रकार सातत्याने घडले. तसेच शेतकऱ्यांना कापसाची रक्कम जून, जुलैअखेरपर्यंतही न मिळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. हा प्रकार रोखण्यासाठी कापूस उत्त्पादक  शेतकऱ्यांना  विक्रीसाठीची नोंदणी आॅक्टोबरपूर्वीच करण्याचा आदेश शासनाने दिला. त्यानुसार अनेक बाजार समित्यांमध्ये सप्टेंबरच्या दुसऱ््या आठवड्यापासून नोंदणी सुरू झाली. बुलडाणा जिल्ह्यात कुठेही अद्याप नोंदणी सुरू झालेली नाही. त्या  शिवाय खरेदी केंद्राची माहितीही मिळालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीबाबत जिल्हा प्रशासन अद्यापही गंभीर नसल्याचा प्रकार घडत आहे. 

 

टॅग्स :khamgaonखामगावcottonकापूस