शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन अनुदान नाही; नांदुरा, मलकापूर, खामगाव तालुक्यातील शेतकरी रांगेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 14:48 IST

शेतकºयांनी दिलेल्या माहितीत त्रुटी आढळून आल्याने तसेच इतर कारणांमुळे खामगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या खात्यात अद्याप अनुदान जमा झाले नसल्याचे चित्र आहे.

-  देवेंद्र ठाकरेखामगाव: सन २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकºयांना शासनाने प्रतिक्विंटल २०० रुपए अनुदान जाहिर केले होते. याला दोन वर्षे पुर्ण होत आले तरी अद्याप ही प्रक्रीया पुर्ण झाल्याचे दिसत नाही. शेतकºयांनी दिलेल्या माहितीत त्रुटी आढळून आल्याने तसेच इतर कारणांमुळे खामगाव, नांदुरा व मलकापूर तालुक्यातील अनेक शेतकºयांच्या खात्यात अद्याप अनुदान जमा झाले नसल्याचे चित्र आहे.खरीप हंगाम २०१६ -१७ मध्ये राज्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढून उत्पन्न वाढले होते. परंतु बाजारात भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहिर केले होते. यासाठी प्रति शेतकरी २५ किवंटल सोयाबीन विक्रीची मयार्दा होती. अनुदान मिळण्यासाठी शेतकºयांनी सोयाबीन विक्री पट्टी, सातबारा, व बॅक पासबूक झेरॉक्ससह अर्ज करावयाचे होते. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीने या अजार्ची छाननी केली होती. नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकºयांपैकी २९४९ शेतकरी पात्र ठरले तर ७०२ शेतकरी अपात्र ठरले. पात्र शेतकºयांमधून सुमारे ४०० ते ५०० शेतकºयांच्या कागदपत्रात त्रुट्या असल्याने त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. अशा शेतकºयांची यादी दुरूस्ती करून पाठविण्यात आली असली, तरी अद्याप त्यांना अनुदानाची प्रतिक्षाच आहे. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत ८१९६ शेतकºयांनी अर्ज केले. यापैकी सुमारे २६०० अर्ज अपात्र ठरविण्यात आले. पात्र शेतकºयांच्या  खात्यात १ कोटी ७० लाख ७२ हजार ३१४ रुपए जमा करण्यात आले. परंतु अद्याप ३३ शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत अर्ज केलेल्या व यातून पात्र ठरलेल्या सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याचे संबंधित बाजार समित्यांच्या सचिवांनी सांगितले. दरम्यान याबाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी जिल्हाउपनिबंधक कार्यालयाच्या दुरध्वनीवर संपर्क केला असता, संपर्क होऊ शकला नाही.

खामागावात सहाय्यक निबंधक कार्यालयात चेक वाटपखामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत पात्र १४ हजार ५९७ लाभार्थ्यांपैकी सुमारे १२ हजार शेतकºयांच्या खात्यात आधीच रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या अजार्तील माहितीत त्रुटी होत्या; त्याची पुर्तता झाली असून खामगाव येथील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात चेक वाटप सुरू आहे. सोमवारी चेक स्विकारण्यासाठी शेतकºयांची गर्दी दिसून आली.

अपात्र शेतकºयांची संख्या मोठीसोयाबीन अनुदानासाठी अर्ज केलेल्या शेतकºयांपैकी अपात्र शेतकºयांची संख्या मोठी आहे. घाटाखालील सहाही तालुक्यात १८ हजार पेक्षा जास्त शेतकरी अपात्र ठरले आहेत. सोयाबीन विक्री पट्टी व सातबाºयामधिल अथवा बँक पासबूकातील माहितीत तफावत तसेच  माल विक्री केलेल्या बाजार समितीत अर्ज न करता इतर बाजार समितीत अर्ज केल्याने अपात्र शेतकºयांची संख्या वाढल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेती