शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 15:26 IST

या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी चौकशीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: नागरी दलितवस्ती योजनेतंर्गत विविध भागातील मिनी हायमास्ट लावण्यासाठी एकाच कंत्राटदाराने २० कामांच्या पूरक निविदांसह ६० निविदा भरल्याचा धक्कादायक प्रकार पालिकेत समोर आला. परिणामी, खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ फासण्यात आल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी चौकशीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाल्याचे दिसून येते.नागरी दलित वस्ती योजनेतंर्गत खामगाव शहरातील विविध भागात मिनी हायमास्ट लावण्यासाठी आपल्या निविदेसह दोन पूरक(सर्पोटींग) निविदा पालिकेला सादर केल्या आहेत. शहरातील २० कामांच्या ४० पुरक निविदांसह सर्व ६० निविदा एकाच कंत्राटदाराने भरल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात दाखल एका तक्रारीवरून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी तातडीने चौकशी समिती नेमली आहे. निविदेची अनामत रक्कम आणि खरेदी रक्कम एकाच खात्यातून भरण्यात आल्याने खामगाव पालिकेतील बनावट निविदा प्रक्रीयेचे बिंग फुटले आहे. या प्रकारामुळे पालिकेतील मिनी हायमास्ट घोटाळा बाहेर येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचा सुत्रांचा दावा आहे.पाच सदस्यीय समिती गठीत!या घोळाच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर राहणार आहेत. तर उपमुख्याधिकारी रविंद्र सूर्यवंशी, लेखापाल अक्षय जोरी, अंतर्गत लेखा परिक्षक आदित्य शिवेकर, विद्युत पर्यवेक्षक सतीश पुदाके समितीचे सदस्य आहेत.

कंत्राटदारांचे स्पष्टीकरण असमाधानकारक!  यामध्ये कंत्राटदार असलेल्या तिघांना पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली. त्यांना खुलासा सादर करण्याचे सुचविले होते. मात्र, तिनही कंत्राटदारांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच आवश्यक ते पुरावे सादर केले नसल्याचे समोर आले आहे.निविदा दाखल केल्याचे खोटे भासविले!कंत्राट मिळविण्यासाठी स्पर्धात्मक प्रक्रीयेतून तिन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. या माध्यमातून नियमांची पुर्तता करण्यात आली. मात्र, या प्रकरणी बॅकेतून सर्व व्यवहार एकाच खातेधारकाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सदर निविदा प्रकियेत तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांनी निविदेत भाग घेतल्याचे भासवून एकाच कंत्राटदाराने निविदा भरल्याचे उघडकीस आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव