शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

देशसेवेसाठी तिन्ही मुलांसह आपणही सज्ज, शहीद जवान नितीन राठोडचा भाऊ प्रवीणची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 22:24 IST

देशसेवेसाठी आपण स्वत: तथा शहीद झालेल्या आपल्या भावाच्या मुलासह आपलीही दोन्ही मुले देशसेवेसाठी कायम सज्ज राहू.

लोणार/बिबी:  देशसेवेसाठी आपण स्वत: तथा शहीद झालेल्या आपल्या भावाच्या मुलासह आपलीही दोन्ही मुले देशसेवेसाठी कायम सज्ज राहू. शत्रुला परास्त करण्यासाठी प्रसंगी कोणतेही शस्त्र चालविण्यास आपण मागे हटणार नाही. शहिदांची आपल्याकडे परंपरा आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील शहीद झालेले सीआरपीएफचे जवान नितीन राठोड यांचे ३१ वर्षीय बंधू प्रवीण शिवाजी राठोड यांनी दिली.दरम्यान, जम्मू काश्मीरमध्येच आतंकवादी का जन्माला येतात. आज राग व्यक्त होत असला तरी आपली तिन्ही मुले देशसेवेमध्ये आपण लावू. येणार्या काळात प्रसंगी देशासाठी कुठलेही हत्यार उचलण्यास आपण सज्ज आहोत. आपली दोन्ही व शहीद भावाचा जीवन हा मुलगा असे तिघेही देशसेवेसाठी आपण देण्यास तयार आहोत. आपण स्वत:ही त्यासाठी संघर्ष करण्यास तयार आहोत. शासनाने फक्त तीनही मुलांसह आपणास सैन्यात घेण्याचे आश्वासन द्यावे. प्रसंगी बॉन्ड पेपरवर ही आपण लिहून देण्यास तयार आहोत. या आत्मघातकी हल्ल्यानंतरही सैन्याची इच्छा शक्ती प्रबळ आहे. ती तसूभरही कमी झालेली नाही. सैन्याची इच्छा शक्ती अधिक प्रबळ व्हावी, त्यासाठी काय प्रयत्न करता येतील यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.शहीद झालेले आपले बंधू हे स्वत:च्या हिंमतीवर सैन्यात भरती झाले होते. एका चूकून त्यांचा युनिफॉर्म आपण अंगावर चढवला होता. तेव्हा तो माझायुनिफॉर्म आहे. तुझ्यात ताकद असले तर स्वत: भरती होऊन दाखव व युनिफॉर्म घाल असे त्यांनी आपणास सांगितले होते, अशी भावनिक आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. आजही जर आदेश दिला तर आपण सैन्यात जाऊ असे प्रविण राठोड म्हणाले.ठोस उपाययोजना करासध्या काय चालल आहे हे  हाताला आणि कमळाला चांगल माहिती आहे. त्यात आपल्याला पडायचे नाही. मात्र सर्वांनी मिळून आता हे सगळ थांबवल पाहिजे. सैन्याला ताकद देऊन त्यांची इच्छा शक्ती अधिक प्रबळ केली जावी, असे ते म्हणाले.ठेचा भाकर खाऊन ८० किलो वजन उचलायचेअवघी दीड एकर शेती आमच्याकडे होती. आपणही शारीरिक सक्षम व तंदुरुस्त व्हावे यासाठी शहीद नितीन राठोड यांनी आपणास जीमचे साहित्यही खरेदी करून दिले होते. साधी ठेचा भाकर खावून आम्ही ८० किलो वजन उचलायचो. आज मनात काय व्याकुळता आहे हे सांगता येत नाही. पण प्रत्येक जवानात मला माझा भाऊ दिसतो. सैन्यावर भ्याड हल्ला करणार्या अतिरेक्यांविरोधात ठोस कारवाई होणे गरजेचे आहे, असे ही ते म्हणाले.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला