शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

नरूभाऊ... मला चिखलीवर हवाय भगवा - उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:06 IST

चिखली : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ढाण्या वाघाची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. अखेर काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश घेतल्याने या चर्चेवर शिक्कामोर्बत झाले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रा. खेडेकरांना शिवबंध बांधून पक्षात प्रवेश देण्यासह चिखलीत भगवा फडकविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ठळक मुद्देनरेंद्र खेडेकरांचा शिवसेनेत प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ढाण्या वाघाची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. अखेर काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश घेतल्याने या चर्चेवर शिक्कामोर्बत झाले असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रा.खेडेकरांना शिवबंध बांधून पक्षात प्रवेश देण्यासह चिखलीत भगवा फडकविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.शिवसेना भवन मुंबई येथे १२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळय़ाला शिवसेना नेते मनोहर जोशी, खा.संजय राऊत, खा.आनंदराव अडसूळ, जिल्हा संपर्क प्रमुख खा.प्रतापराव जाधव, खा.भावना गवळी, आमदार डॉ.शशिकांत खेडेकर, आमदार डॉ.संजय रायमुलकर, जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत, माजी आमदार विजयराज शिंदे, भास्करराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना २८८ जागा स्वबळावर लढून जिंकणार असल्याचा विश्‍वास व्यक्त करून त्यानुषंगाने चिखली विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी जोमाने प्रयत्न करा, असे सांगितले, तसेच यापुढे भाजपासोबत कदापि युती करणार नसल्याचे स्पष्ट करीत भाजपासोबत युती का तोडली, हे सांगण्याची आता गरज नाही. केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर युती केली होती; मात्र सत्तेचे राजकारण करीत त्यांनी शिवसेनेला झुलवत ठेवले. आता त्यांना भगव्याची ताकद दाखवून द्यावी लागेल, यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, शिवसैनिक एकवटल्यास कुणाशी युती करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले, तर विदेशात जावून हिंदुंची मंदिरे बांधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशातील अयोध्येतील राम मंदिर मात्र अद्यापही बांधणे झाले नसल्याची टीका करून पाकिस्तान आपल्या भूमीवर येऊन आपल्याशी युद्ध करीत आहे. हे दहशतवादी हल्ले नसून, आपल्याच भूमिचा वापर आपल्या सैनिकांना टिपण्यासाठी केला जात आहे आणि आपल्या देशाचे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनीदेखील शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी मनोज नगरिया, उपजिल्हाप्रमुख सिद्धुसिंग राजपूत, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, शहरप्रमुख नीलेश अंजनकर, विश्‍वास खंडागळे, विलास सुरडकर, नरेश राजपूत, शिवाजी पवार, प्रदीप वाघ, किसन धोंडगे, विलास घोलप, विलास राजपूत, सखाराम भुतेकर, रवि भगत, o्रीराम झोरे, राजेश झगरे, कृष्णा वाघ, दिलीप चिंचोले, रामकृष्ण अंभोरे, समाधान जाधव, शुभम खेडेकर, विनायक पडघान, रवि पेटकर, रमेश म्हस्के, अनिल कर्‍हाडे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. 

पक्षप्रवेशानंतर शहरात जल्लोषात स्वागतशिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून आपली वेगळी छाप उमटविल्यानंतर काँग्रेसवासी झालेले प्रा.नरेंद्र खेडेकर यांची शिवसेनेत घरवापसी झाल्याने शिवसैनिकांमध्येही उत्साह संचारला आहे. प्रा.खेडेकरांच्या पक्षप्रवेशानंतर १३ फेब्रुवारी रोजी शहरात आगमन होताच शिवसैनिकांसह त्यांच्या सर्मथकांनी त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषात स्वागत केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेbuldhanaबुलडाणा