शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

निर्गुण पादुका उत्सव : दत्तगुरूंच्या नामाने दुमदुमली खामगाव नगरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 19:50 IST

श्री दत्तगुरूच्या निर्गुण पादुका स्थापित असलेल्या महाराष्ट्रातील चार पीठापैकी एक असलेल्या  श्री मुक्तेश्वर आश्रमाद्वारे गुरूवारी दुपारी ४ वाजता संचारेश्वरांची  शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेले भाविक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. 

ठळक मुद्दे शोभायात्रेने निर्गुण पादुका महोत्सवाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  श्री दत्तगुरूच्या निर्गुण पादुका स्थापित असलेल्या महाराष्ट्रातील चार पीठापैकी एक असलेल्या  श्री मुक्तेश्वर आश्रमाद्वारे गुरूवारी दुपारी ४ वाजता संचारेश्वरांची  शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेले भाविक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. श्री संचारेश्वरांच्या निर्गुण पादुका उत्सवानिमित्त श्री निर्गुणपादुका संचारेश्वर ट्रस्ट खामगावच्यावतीने   ०८ डिसेंबर ते १४ डिसेंबरदरम्यान स्थानिक मुक्तेश्वर आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.   गाणगापूर, कारंजा आणि लातूरनंतर महाराष्ट्रात केवळ खामगावात श्री दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांची स्थापना प.पू. नृसिंह संचारेश्वर उपाख्य धर्मभास्कर श्री संत पाचलेगावर महाराज यांनी मुक्तेश्वर आश्रमात केली आहे. दत्तगुरूंच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनासाठी  तसेच  या आश्रमात मनोकामना पूर्ण होत असल्याची अनुभूती अनेकांना आली आहे. त्यामुळे खामगावातील निर्गुण पादुका महोत्सवाला राज्यातील भाविकांची मोठी उपस्थिती लाभते. यावर्षी सोमवारपासून सुरू झालेल्या निर्गुण पादुका महोत्सवास  मुंबई, अहमदनगर, पुणे, गाणगापूर, कारंजा, अमरावती, जालना, औरंगाबाद, माहूर येथील भाविकांसोबतच उज्जैन आणि ओंकारेश्वर, गुजरात, सुरत येथील भाविकही दाखल झाले आहेत. अनुष्ठान, कीर्तन, प्रवचनानंतर रविवारी या उत्सवाची शोभायात्रेने सांगता करण्यात आली. यावेळी सकाळी पूजा अर्चा आणि महाप्रसादानंतर संचारेश्वरांच्या पादुकांची तसेच मूर्ती भव्य शोभायात्रा स्थानिक मुक्तेश्वर आश्रमापासून दुपारी ५ वाजता काढण्यात आली.  यावेळी मातृशक्ती व दुर्गा वाहिनीच्या ढोल पथकाने प्रात्यक्षीक सादर केली.

आज गुरूमंत्र सोहळा!गुरूवारी पहाटे प.पू. पाचलेगांवकर महाराजांच्या मूर्तीला रुद्राभिषेक करण्यात आला. सकाळी ८ वाजता श्री निर्गुणपादुका आणि प.पू. पाचलेगांवकर महाराजांच्या दर्शनाला सुरूवात झाली. दुपारी १२ वाजता माध्यान्न आरती व महाप्रसादानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. गुरूवार हा उत्सवाचा प्रमुख दिवस म्हणून पार पडला. उद्या शुक्रवारी सकाळी ७ वाजतापासून गुरूमंत्र सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगाव