शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

घनकचरा व्यवस्थापनासाठी ९ चारचाकी घंटागाड्या दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 15:55 IST

आता ९ चारचाकी घंटागाडी नव्याने दाखल झाल्या असून उर्वरित ११ गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी नव्याने ९ घंटागाडी खामगावात दाखल झाल्या आहेत. मात्र, आधीच्याच ३३ तीनचाकी घंटागाडी खामगाव पालिकेच्या आवारात गत सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून उभ्या आहेत. त्यामुळे शहरातील घन कचरा व्यवस्थापनाला गती मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणखी ११ चारचाकी घंटागाडी दाखल होणार आहेत.स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक शहर स्वच्छ करण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी नानाविध प्रयत्न केल्या जात आहे. असे असले, तरी घनकचऱ्याचा प्रश्न सोडविता- सोडविता मोठमोठ्या शहरांच्या नाकीनऊ आले आहेत. कचरा प्रकरणांवरून अनेक मोठ्या शहरांमध्ये रणकंदन माजल्याची उदाहरणेही ताजी आहेत. दररोज निर्माण होणाºया सुक्या व ओल्या कचºयाची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे यावर प्रभावी उपाययोजनांसाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कचºयाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या अनुषंगाने प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतुद शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. याअंतर्गत कोणत्या शहराला किती निधीची गरज आहे, हे ठरविण्यासाठी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे काम शासनाकडून मार्स प्लानिंग अ‍ॅन्ड इंजिनिअरिंग सिस्टीम प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले होते. याकंपनीने शहरातील घन कचºयाच्या व्यवस्थापनासाठी ५३ गाड्या प्रस्तावित केल्या होत्या. यामध्ये ३३ तीन चाकी तर २० चारचाकी गाड्यांचा समावेश होता. यापैकी तीनचाकी गाड्या सहामहिन्यांपूर्वीच दाखल झाल्या आहेत. तर आता ९ चारचाकी घंटागाडी नव्याने दाखल झाल्या असून उर्वरित ११ गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले.घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची सोय!डीपीआरनुसार शहरात दररोज निर्माण होणारा ओला तसेच सुका कचरा उचलण्यासाठी ५३ नव्या गाड्या खरेदी करण्याचे प्रयोजन केले होते. यात २० टिप्पर तर ३३ छोट्या घंटा गाड्यांचा समावेश आहे. या सर्वच घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची सोय असलेल्या यामधील काही गाड्या राहणार आहेत.

निविदा प्रक्रीया अंतिम टप्यात!खामगाव पालिकेतील ३३ तीनचाकी आणि २० चारचाकी घंटागांड्यावर ५३ चालक आणि ५३ हेल्पर तसेच या गाड्यांची देखभाल दुरस्तीसाठी निविदा प्रक्रीया अंतिम टप्यात आहे. स्वच्छ भारत अभियानातंर्गत या निविदा प्रक्रीयेला मूर्त रूप देण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगाव