शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

नऊ हजार वजन काट्यांचे ‘पासिंग’ नाही!

By admin | Updated: March 15, 2016 02:16 IST

वजनमापे विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

नीलेश शहाकार / बुलडाणा जागो ग्राहक जागो, अशी जाहिरात करून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर होत असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ग्राहकांची फसगत होत असल्याचे चित्र आहे. अ प्रमाणित वजन-मापे आणि काट्यातून ग्राहकांची फसवणूक होत आहे. जिल्ह्यातील १३ हजार ४३५ इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे कार्यरत आहेत; मात्र वैधमापन विभागाच्या दुर्लक्षामुळे यापैकी ९ हजार ९0 वजनमापे पासिंगच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात अनेक दुकानांमध्ये व रस्त्यावरील विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. बर्‍याच दुकानामध्ये काटा पासिंग केलेला नसतो, वजन प्रमाणित नसतात; मात्र ग्राहकांना वस्तू त्याच काट्यावर मोजून दिल्या जातात. नियमाप्रमाणे प्रतिवर्षी वजन काट्यांचे पासिंग करणे आवश्यक असते. त्यासाठीचे प्रमाणपत्र मिळविणे गरजेचे असते; मात्र काही अ पवादास्पद दुकानदार वगळता जिल्ह्यातील बर्‍याच दुकानदारांनी अद्यापही आपल्या काट्याचे पासिंग केले नाही. जिल्ह्यात सध्या विविध दुकानदार, मुख्य व्यावसायिक, लहान कारखाने, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, बियाणे व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेते व इतर लहान-मोठय़ा व्यावसायिकांकडे १३ हजार ४३५ इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे कार्यरत आहे. त्यापैकी बुलडाणा सहायक नियंत्रक वैधमापन विभागाकडून केवळ ४ हजार ३३५ वजनमापाची तपासणी करून पासिंग करून घेतली. त्यामुळे इतर ९ हजार ९0 वजनमापे दोषपूर्ण असून, त्यातून ग्राहकांची फसगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारवाईची उद्दिष्टपूर्ती नाहीयेथील सहायक नियंत्रक वैधमापन विभाग, बुलडाणा सध्या कोमात आहे. त्यामुळे येथील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या महसुली वर्षात विभागाला ३४ लाख ३0 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र बुलडाणा कार्यालयाने केवळ १७ लाख ४२ हजारांचा महसूल मिळवून दिला. २0१५-१६ या वर्षात वजनमापे तपासणी व दंड वसुलीसाठी जिल्ह्याभरात ६७१ कार्यवाही केल्या. तपासणी प्रक्रिया रखडली!जुने तराजू व वजन मापे प्रमाणित आहेत किंवा नाही, इलेक्ट्रॉनिक काट्यामागे सील तसेच पासिंगची तारीख तपासणी करणे आवश्यक आहे. ग्राहक जागृती कार्यक्रमातून ही प्रक्रिया राबविली जाते; मात्र या कार्यक्रमासाठी शासनाकडून पुरेसे अनुदान मिळत नाही. माग दुकानदारांवर कारवाई करुन आपले वैयक्तिक हितसंबंध खराब का करावे, ही भूमिका अधिकारी घेताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तपासणी प्रक्रिया रखडली आहे.