शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Online Education : अभ्यासासाठी आणखी नऊ 'चॅनल' सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:51 IST

आॅनलाइन शिक्षणासाठी तीन चॅनल सुरू करण्यात आले असून, डी. डी. सह्याद्री या चॅनलचाही आधार घेण्यात येणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ‘शाळा बंद शिक्षण’ ही अभ्यासमाला राज्यभर सुरू करण्यात आली आहे. आॅनलाइन शिक्षणासाठी तीन चॅनल सुरू करण्यात आले असून, डी. डी. सह्याद्री या चॅनलचाही आधार घेण्यात येणार आहे. पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमासाठी आणखी नऊ चॅनल नव्याने सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाच्या सुरू आहेत.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याला पालकांसह शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन समितीकडून नकार दर्शविण्यात येत आहे. परंतू शाळा सुरू झाल्या नाही, तरी शैक्षणिक सत्र सुरू करण्याच्या अनुषगांने आॅनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ०५ जुलै २०२० रोजी राज्यातील इयत्ता १० वी मराठी माध्यम, इयत्ता १० वी इंग्रजी माध्यम व इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी एका खासगी कंपनीकडून टी.व्ही.वर स्वतंत्र ३ ज्ञानगंगा शैक्षणिक चॅनेलचे उद्घघाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या टी.व्ही. वरील हे चॅनल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक व इंटरनेट सुविधा आवश्यक आहे. अभ्यासाचे रेडीओ कार्यक्रम ऐकण्यासाठी स्मार्ट फोन व इंटरनेट सुविधा आवश्यक आहे. या तीन चॅनलच्या माध्यमातून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. त्यात आता आणखी वाढ करण्यात येणार असून पहिली ते बारावीच्या सर्व वर्गांसाठी नऊ चॅनल लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र चॅनलसध्या तीन चॅनलद्वारे दहावी व बरावीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. आता नव्याने नऊ चॅनल सुरू करून प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र चॅनल राहणार आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व वर्गांचा अभ्यास स्वतंत्र चॅनलवरून सुरू होणार आहे. येणाऱ्या नऊ चॅनलमध्ये इयत्ता दहावी उर्दू माध्यम, नववी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम, इयत्ता आठवी मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम, इयत्ता सातवी मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम, इयत्ता सहावी मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यम, इयत्ता तिसरी व चौथी एकत्र मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांचा अभ्यास उपलब्ध होणार आहे.

सर्व विषयांचे ई- साहित्य होणार लवकरच उपलब्धअभ्यासाठी सद्यस्थितीत एका खासगी कंपनीची टीव्हीची सुविधा केवळ त्या कंपनीचे सिमकार्ड धारकांसाठी उपलब्ध आहे; परंतू काही दिवसातच सर्व इयत्तांचे, सर्व विषयांचे ई साहित्य यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व स्मार्ट मोबाईल धारकांना उपलब्ध होणार आहे. सर्व माध्यमांचे व सर्व विषयांचे ई साहित्य लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

स्थानिक केबलला डावलले?सुरूवातीला स्थानिक केबलचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडीओ दाखवण्यात येणार होते. मात्र स्थानिक केबलच्या ऐवजी आता दुसºया खासगी कपंनीकडून हे चॅनल सुरू केले जाणार आहे. डी. डी. सह्याद्री चॅनलवरूनही शैक्षणिक कार्यक्रम प्रवासीत केले जाणार आहे. चार-चार तासाचे अभ्यासाचे व्हिडीओ या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.

दहावी व बारावीच्या अभ्यासासाठी तीन चॅनल सुरू करण्यात आले आहेत. लवकरच नऊ चॅनलद्वारे अभ्यास सुरू करण्यात येणार आहे. डी. डी. सह्याद्रीवरूनही शैक्षणिक क्रार्यक्रमाचे व्हिडीओ प्रसारीत होतील.-एजाज खान,प्राथमिक, शिक्षणाधिकारी,बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रonlineऑनलाइन