शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कैद्यांना अकोला कारागृहात हलविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:47 IST

कैद्यांची कोर्ट पेशीही आता व्हीसीद्वारे घेण्यात येणार आहे.

- सोहम घाडगे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचा संभाव्य धोका पाहता जिल्हा कारागृहात खबरदारी घेण्यात येत आहे. कारागृहाची क्षमता १०१ असतांना सध्या कारागृहात २९४ बंदी आहेत. त्यामुळे नवीन कैद्यांना बुलडाण्याऐवजी अकोला येथील कारागृहात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कैद्यांची कोर्ट पेशीही आता व्हीसीद्वारे घेण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. जिल्हात कोरोना संशयावरुन १९ जण निरीक्षणाखाली आहेत. कोरोनाबाबत जिल्हा कारागृहात खबरदारी घेण्यात येत आहे.कैद्यांची दररोज वैद्यकिय तपासणी करण्यात येत आहे. सकाळी व सायंकाळी अशी दोन वेळेस डॉ. रोठे कैद्यांची तपासणी करतात. कैद्यांना सर्दी, खोकला, ताप, घसा दुखीचा त्रास होतो का, याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.कैद्यांच्या रोजच्या दिनक्रमात योगा, प्राणायामचा समावेश असून त्यांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.कारागृहातील वातावरण चांगले राहावे व कैद्यांच्या मनातील नकारात्मक विचार दूर सारण्यासाठी नियमित अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. भजनाची आवड असणारा भजन म्हणेल. कुणी पोवाडा, कुणी अभंग, कुणी सुविचार, कुणी कथा सांगेल अशा पद्धतीने कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे कैद्यांचे आरोग्यही चांगले राहते व सकारात्मक विचार वाढतात, असे कारागृह अधिक्षकांनी सांगितले.राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील सर्व कारागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व कारागृहांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात येत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAkolaअकोलाPrisonतुरुंग