शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकावर नवे संकट; शेंगांची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 17:38 IST

सोयाबीनच्या पानासह शेंगावर जिवाणूचे ठिपके पडले आहेत; त्याचबरोबर शेंगानाही गळती लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. 

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: राज्यात ३९ लाख ५४ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिक आहे. परंतू सध्या हवामानातील आद्रता वाढल्यामुळे सोयाबीन पिकावर रोगाचे नवे संकट निर्माण झाले आहे. आद्र हवामानामुळे सोयाबीनच्या पानासह शेंगावर जिवाणूचे ठिपके पडले आहेत; त्याचबरोबर शेंगानाही गळती लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. सोयाबीन पिकापासून उत्पन्नात भरघोस वाढ होत असल्यामुळे शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. पूर्वी विदर्भातच सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक होते. मात्र आता राज्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे यावर्षी राज्यात नियोजीत क्षेत्रापेक्षा सोयाबीनचा पेरा अधिक आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३४ हेक्टर आहे. त्यापैकी ३९ लाख ५४ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. परंतू सध्या सर्वत पावसाचे वातावरण असल्याने या पिकाला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक झाल्याने सोयाबीन पिक रोगीष्ट बनले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडांच्या पानावर व शेंगावर त्रिकोणी, चौकोणी आकाराचे तपकिरी, करड्या रंगाचे ठिपके पडले आहेत. काही ठिकाणी रोगाची तिव्रता वाढल्याने सोयाबीनच्या झाडाची पाने व शेंगा गळून पडत आहे. हवामानातील आद्रता जस-जशी वाढत जात आहे, त्याच वेगात हा रोगही झपाट्याने वाढत आहे. सध्या सोयाबीन पिक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतू बदलत्या वातावरणाचा परिणाम या पिकावर झाल्याने शेंगा भरण्यापूर्वीच गळून पडत आहेत. पानावर छिद्रेही पडत आहेत. त्यामुळे शेतकºयांसमोर सोयाबीन पिक वाचविण्याचे संकट आता निर्माण झाले आहे. 

 सध्या सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतकºयाने वेळेवर फवारणी केली नसेल, तर काही ठिकाणी असा प्रकार असू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून न जाता कृषी सल्ला घेऊन वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्या.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी