शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नीरीच्या संशोधकांनी घेतले लोणार सरोवरातील सहा ठिकाणचे पाण्याचे नमुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 10:59 IST

अध्ययनानंतर आठवडाभरात पाण्याचा रंग बदलण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.

बुलडाणा: लोणार सरोवरातील पाण्याचा लालसर गुलाबी रंग होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सरोवरातील सहा ठिकाणचे नमुने निरीच्या संशोधकांनी गोळा केले असून सविस्तर अध्ययनानंतर आठवडाभरात पाण्याचा रंग बदलण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे निरीचे वरिष्ठ वैज्ञानिक अतुल मालधुरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, १५ जून रोजी सरोवराच्या चारही बाजूकडील आणि सरोवराच्या मध्य भागातील दोन फुट खोल पाण्यातील नमुनेही या संशोधकांनी घेतले आहे. नीरीचे एक पथक १५ जून रोजी दुपारी दीड वाजता येथे पोहोचले. यामध्ये मुख्य संशोधक डॉ. गजानन खडसे, वरिष्ठ संशोधक अतूल मालधुरे आणि सहकारी महेश कुमार यांचा समावेश होता. वन्यजीव विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी एस. बी. नप्ते, वनरक्षक डी. एल. शिंदे, एच. जे. माने, जी. आर. शिंदे, के. बी. सरकटे आणि के. ई. नागरे यांनी त्यांना लोणार सरोवराचा परिसर दाखवला. आल्या आल्या या शास्त्रज्ञांनी थेट सरोवरात उतरणे पसंत केले. दरम्यान, ‘येथे येण्यापूूर्वी पाणी लालसर गुलाबी झाले होते. मात्र त्याती घनता तुलनेने कमी होती’, असे आपल्याला सांगण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीही बॅक्टेरिया आणि अलगीमुळे (शैवाल) पाण्याचा रंग बदलल्याची काही उदाहरणे आहेत. प्रामुख्याने मे १५ ते जून १५ या कालावधीत तापमान आपल्याकडे वाढलेले असते. या कालावधीत अलगी वाढण्याचे प्रमाण अधिक असते. त्यातून काही बॅक्टेरियाही जनरेट होतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. पण, लोणार सरोवरातील पाण्याची फिजीओ केमिकल प्रॉपर्टी ही अन्य सरोवरांच्या तुलनेत वेगळी आहे. साधारणत: समुद्राच्या पाण्याप्रमाणेच लोणार सरोवरातील क्षारतेचे प्रमाण आहे. त्यामुळे येथील मायक्रो बायोलॉजिकल अ‍ॅक्टीव्हीटी वेगळी आहे. वाढत्या तापमानामुळे येथे बॅक्टेरिया, अलगी अधिक वाढली असावी आणि त्यातून पिगमिटेशन (रंगद्रव्याचा थर) झाले असावे, असा अंदाज, अतुल मालधुरे यांनी  व्यक्त केला. मात्र प्रत्यक्षात सविस्तर अध्ययनानंतरच याबाबत अधिक स्पष्टपणे बोलणे योग्य राहील, असे ते म्हणाले. लोणार सरोवराचे नऊ जून रोजी पाणी लालसर गुलाबी झाल्याचे समोर आले होते. त्यासंदर्भात विविध अंदाज व्यक्त केले जात होते. या प्रश्नी प्रशासकीय पातळीवरही यंत्रणेने त्वरित हालचाल करून निरी अर्थात नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या पथकाला लोणार सरोवर येथे पाचारण करण्यात आले होते. लोणार येथेच हे तीन सदस्यीय पथक १५ जून रोजी मुक्काम करत आहे. त्यामुळे प्रसंगी मंगळवारी सकाळी ते पुन्हा सरोवराची पाहणी करू शकतात, असा कयास व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणाLonarलोणार