शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ४८३ तलावावर नील क्रांती योजना

By admin | Updated: March 21, 2017 01:43 IST

मत्स्योत्पादनाला प्रोत्साहित करण्यासाठी उपाययोजना.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. २0- जिल्ह्यामध्ये मोठे जलक्षेत्र मत्स्योत्पादनासाठी अनुकूल आहे. मत्स्योत्पादनाला प्रोत्साहित करण्यासाठी नील क्रांती योजना राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील ४८३ तलावांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाकडून यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाकरिता जिल्हा योजनेंततर्गत निरनिराळे कार्यक्रम राबविले जातात. युवकांना प्रशिक्षण, खार्‍या व गोड पाण्यातील मत्स्य संवर्धन, मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य, मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना भाग भांडवल, मच्छीमारांना विमा उतरविण्यासाठी अनुदान इत्यादी योजनांचा यात सहभाग आहे. आता यात नील क्रांती योजनेचा समावेश झाला आहे.जिल्ह्यात पैनगंगा, खडकपूर्णा, पूर्णा, नलगंगा, विश्‍वगंगा, मस, कोराडी या सात नद्या आहे. तर सिंचन विभाग, जिल्हा परिषद, ग्रा.पं., नगरपालिका यांच्या अधीन असलेले ४८३ तळे, सरोवर व जलाशये उपलब्ध आहे. ज्याची एकूण लांबी ४४0 कि.मी. एवढी आहे. याअंतर्गत मत्स्य व्यवसायासाठी १0 हजार ९२३.६ हेक्टर जलक्षेत्र आले आहे; मात्र बर्‍याच जलाशयाला कोरड पडल्याने मत्स्यव्यवसायाला धोका निर्माण होतो. यामुळे या नवीन योजनेतून मत्स्योत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणार आहे. बेरोजगारांना मिळणार रोजगार!नील क्रांती योजनेत रोजगार निर्मितीच्या दृष्टीने बेरोजगारांसाठी ५0 टक्के अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. यासाठी केंद्र शासनाकडून २९ कोटी ४१ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राज्य शासनाला १४ कोटी ७0 लाख ९३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. ५५९ लाख मत्स्यबीजांची निर्मितीमेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी जवळ कोरडी पाटबंधारे प्रकल्पाखाली मत्स्यबीज निर्मित केंद्र उभारण्यात आले आहे. यात ५५९ लाख मत्स्यबीज निर्मिती करण्यात आली असून कटला, रोहू, मृगळ, साप्रनस, ग्रासकार्य, सिल्हरकार्य आदी जातीच्या मत्स्य बीजांचा समावेश आहे. विभाग तलावाची संख्या सिंचन विभाग-१0२जिल्हा परिषद-३३१ग्रामपंचायत-     ४७नगरपालिका-    0३एकूण-            ४८३ जिल्हा तलाव व नद्यांची संख्या जास्त असून मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून यात मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे नील क्रांती योजनेतून बेरोजगारांच्या हाताला काम मिळले. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी शासनाच्या योजनेचा लाभ द्यावा.- स. इ. नायकवाडीसहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, बुलडाणा.