शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यासाठी एकजूट आवश्यक- डांगे

By admin | Updated: May 30, 2017 01:13 IST

खामगाव येथे धनगर समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या धनगर समाजात संघटन आणि एकजुटीचा अभाव आहे. त्यामुळे समाजात समस्या वाढीस लागल्या असून, या समस्यांचा नायनाट करण्यासाठी एकजूट व्हावे, असे भावनिक आवाहन धनगर महासंघाचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी येथे केले.लोकमाता पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिरात धनगर समाजाचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार नाना कोकरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने, समाजकल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, शरद वसतकार, डॉ. अलका गोडे, पुष्पा गुलवाडे, भारत वाघ, शत्रुघ्न पाचपोर, अरूण देवकते, कृउबास संचालक अशोक हटकर, शांताराम बोधे, वर्षा गुरव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावर बोलताना श्रीराम पुंडे यांनी धनगर समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक समाज बांधवाने तन-मन-धनाने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी केले. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील पंचायत समिती, नगर परिषद, जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत स्तरावर विजयी झालेल्या समाजातील लोकप्रतिनिधींसह शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या मेळाव्याला तुळसाबाई वाघ, प्रभाकर वरखेडे, साहेबराव फासे, सुखदेव कवळकार, संगीता पांढरे, ज्योती कचरे, कल्पना वसतकार, आनंद हागारे, अनंता बोरसे, सारंगधर नवलकार, कैलास डांगे, श्रीकृष्ण बोरसे, गजानन गुरव, रंजना बोरसे, संतोष टाले, रवींद्र गुरव, आनंद नागे, नामदेव बाजोडे, संतोष ढेकळे, गणेश वरखडे, आदींची उपस्थिती होती.