खामगाव (बुलडाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला व प्रत्यक्ष कृतीतून हे अभियान सुरू केले; मात्र या अभियानात लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अजूनही वाढलेला नाही. या पृष्ठभूमिवर आज खामगाव शहरात सर्वेक्षण केले असता, ३२ टक्के नागरिकांनी या अभियानापासून दूर राहणेच पसंत केले असल्याचे दिसून आले आहे. स्वच्छ भारत अभियान दिखाऊपणा म्हणून राबविले जाते का? अशी विचारणा केली अस ता, ७३ टक्के नागरिकांनी नाही, असे मत नोंदविले तर २१ टक्के नागरिकांनी होय व ६ टक्के नागरिकांनी माहीत नाही, असे उत्तर दिले आहे. अशा अभियानामधून नागरिकांचा त्रास वाढ तो का? हा प्रश्न विचारला असता ८६ नागरिकांनी स्पष्टपणे नाही, असे उत्तर दिले. सहा टक्के नागरिकांना मात्र अशा अभियानाचा त्रास जाणवतो व सहा टक्के लोक याबाबत मत नोंदविण्यास तयार नाहीत. या सर्वेक्षणाचे विश्लेषण केले असता स्वच्छ भारत अभियान राबविले गेले पाहिजे, असा सूर व्यक्त होतो व हे अभियान लोकसहभागातूनच व्हावे, याबाबतही कुणाचे दुमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वच्छ भारत अभियानात लोकसहभागाची गरज
By admin | Updated: November 7, 2014 23:19 IST