शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहाराची गरज - डॉ. साधना पाचरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 14:49 IST

अमरावती येथील ‘विना तेलाची भाजीची भीसी’  संकल्पनेच्या प्रणेत्या तथा आहारतज्ज्ञ डॉ. साधनाताई पाचरणे यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : चुकीच्या आहारामुळेच प्रकृतीत विकृती निर्माण होते. शरीरात विविध आजाराची वाढ होते. निरोगी रहायचे असेल तर प्रत्येकाने नैसर्गिक आणि संतुलित आहार सेवन करणे गरजेचे आहे . अमरावती येथील ‘विना तेलाची भाजीची भीसी’  संकल्पनेच्या प्रणेत्या तथा आहारतज्ज्ञ डॉ. साधनाताई पाचरणे यांच्याशी साधलेला संवाद...

विना तेलाच्या भाज्यांच्या प्रशिक्षणाची संकल्पना कशी सुचली?विना आणि कमी तेल्याच्या भाज्या तयार करण्याचे अमरावती येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कमी तेलाच्या भाज्या खाण्यास स्वत:पासून सुरूवात केली. पुढे घरातील मंडळी, नातेवाईक आणि मैत्रिणींना ही संकल्पना सांगितली. अनेकांना लाभ मिळाल्याचा अनुभव आल्याने विनातेलाच्या प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्यात.

‘विना तेलाच्या भाजीची भीसी’ म्हणजे काय?प्रशिक्षण आणि कार्यशाळांना वेगळे आणि नाविण्यपूर्ण स्वरूप देण्यासाठी परिसरातील महिला आणि मैत्रिणींच्या सहभागातून ‘विना तेलाची भाजी तयार करण्याची भीसी’ सुरू केली. आठवड्यातून एकदा समुहात सहभागी सदस्यांकडून विना तेलाची भाजी करून घेण्यात आली. या संकल्पनेला आता व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.

विना तेलाच्या भाज्यांच्या सेवनाचे काही फायदे?निश्चितच, आपल्यासाठी समतोल, पोषक, सात्विक आहार हेच उत्तम औषध आहे. कमी आणि विना  तेलाच्या भाज्यांमुळे वजन कमी होण्यासोबतच, अपचन आणि अ‍ॅसिडीटी यासारख्या विकारात हमखास लाभ मिळतो.

 भाज्या तयार करण्याच्या कार्यशाळा कुठे आयोजित केल्यात.?अमरावती येथून नि:शुल्क कार्यशाळांना सुरूवात केली. अमरावती नंतर बुलडाणा, अकोला, पुणे, औरंगाबाद, वाशिम, अहमद नगर, जळगाव खांदेश आणि मुंबई सारख्या शहरात नि:शुल्क कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या तिन्ही धातंूचे समप्रमाण माणसाला निरोगी जीवन देतात. आजारी पडून औषध घेण्यापेक्षा आजार होऊच नये, याची प्रत्येकाने काळजी घेणे अधिक शहाणपणाच ठरते. नैसर्गिक आहार हेच मनुष्यासाठी जीवनदायी अन्न आहे.

 विना तेलाच्या भाज्या तयार करण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले?योग्य आहाराचा मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. याउलट आहार बिघडल्यास त्याचे परिणाम आरोग्यावर आणि प्रकृतीवर दिसू लागतात. म्हणजेच आरोग्य आणि आहाराचा जवळचा संबध आहे. आहाराविषयक काहीतरी वेगळं करण्याची जिज्ञासा गत अनेक दिवसांपासून मनात होती. त्यामुळे याविषयी कुठे कार्यशाळा होतात का? याची माहिती घेतली. त्यानंतर अमरावती येथील प्रयास-सेंवाकूर संस्थेचे निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. जीवनलाल गांधी आणि डॉ. अविनाश सावजी यांच्या विविध कार्यशाळांमध्ये विनातेलाच्या भाज्यांचे प्रशिक्षण घेतले.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत