शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांना अपेक्षीत असलेली पत्रकारिता  काळाची गरज : राजकुमार बडोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:12 IST

खामगाव: जातीय विषमतेसारखे अनेकविध प्रश्न आजही कायम आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत असलेल्या समाजनिर्मितीसाठी लिखाण करण्याची गरज आहे. यासाठी पत्रकारांनी समाजाभिमुख लिखाण करावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले यांनी येथे केले. 

ठळक मुद्देमंदार फणसे यांना राज्यस्तरीय मूकनायक पुरस्कार प्रदान

खामगाव: जातीय विषमतेसारखे अनेकविध प्रश्न आजही कायम आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत असलेल्या समाजनिर्मितीसाठी लिखाण करण्याची गरज आहे. यासाठी पत्रकारांनी समाजाभिमुख लिखाण करावे असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले यांनी येथे केले. मुंबई येथील वरिष्ठ संपादक मंदार फणसे यांना राज्यस्तरीय मूकनायक पुरस्काराने शुक्रवारी  खामगाव येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ‘मूकनायक’ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार समितीच्यावतीने स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिर येथे शुक्रवारी सायंकाळी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. राजकुमार बडोले होते.  तर प्रमुख अतिथी म्हणून खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, भारिप नेते अशोक सोनोने,  विनोद राऊत, पत्रकार राजेश राजोरे, मूकनायक राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण समितीचे अध्यक्ष राहुल पहुरकर यांची विचारमंचावर उपस्थिती होती.  कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  आणि प्रथम महिला संपादिका तानूबाई बिरजे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  त्यानंतर मूकनायक बाबासाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्र क्षेत्रातील योगदान तसेच मंदार फणसे यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा  लघुपट स्क्रीनवर दाखविण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मूकनायक पुरस्काराने मंदार फणसे यांना सन्मानित करण्यात आले. तत्पूर्वी ओमप्रकाश शेटे यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला.  यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणेही झालीत. या सोहळ्याला कृउबास सभापती संतोष ताले,  उपसभापती निलेश दीपके, नगरसेवक विजय वानखडे, तेजेंद्रसिंह चव्हाण, संजय शिनगारे यांच्यासह राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मूकनायक राज्यस्तरीय पत्रिकारिता पुरस्कार समितीचे अध्यक्ष राहुल पहुरकर, संयोजक श्रीधर ढगे यांच्यासह आयोजन समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले. संचालन अरविंद शिंगाडे यांनी केले.

टॅग्स :khamgaonखामगावRajkumar Badoleराजकुमार बडोले