शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’बाबत दक्षता बाळण्याची गरज - हेमराज राजपूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 11:37 IST

आंतरिक सेवा सुरक्षा पदक प्राप्त अपर पोलिस अधिकारी  हेमराजसिंह राजपूत यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : पोलिस सेवेतील  विविध पदक आणि  पुरस्कारांनी  मनोबल उंचावण्यास मदत होते. ही पदकं आणि पुरस्कार  इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. आंतरिक सेवा सुरक्षा पदक प्राप्त अपर पोलिस अधिकारी  हेमराजसिंह राजपूत यांच्याशी साधलेला संवाद...

आंतरिक सेवा सुरक्षा पदक कुणाला दिलं जाते ?नक्षली भागात दोन वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा देणाºया पोलिस कर्मचारी अधिकाºयांना आंतरिक सेवा सुरक्ष पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा राज्यातील १, १७२ पोलिस अधिकारी आणि कर्मचाºयांना आंतरिक  सुरक्षा पदकाने सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांचाही समावेश आहे.

आपल्या मते सेवा काळात नक्षली भागातील उपलब्धी काय?गडचिरोली येथे सेवारत असताना नक्षलवाद्यांनी २५ किलो वजनाचा भुई स्फोट पेरल्याचा शोध लावण्यात आला. तसेच हा स्फोट निकामी करण्यात आला.  तर चंद्रपूर येथे असताना एका बड्या नक्षल्यास अटक करण्यात आली. नक्षली संघटनांचा बिमोड करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. तसेच स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्यात ग्राम रक्षक दलाची स्थापना केली. या दलातील सदस्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत ६०० सायकलींचे वितरण करण्यात आले.

आपल्या नक्षली भागातील सेवेबाबत काय सांगाल?राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागाचा नक्षली भागात समावेश होतो. पोलिस विभागात रूजू झाल्यानंतर गडचिरोली येथे पोलिस उपअधिक्षक म्हणून २०१०-१२  सेवा दिली. त्यानंतर चंद्रपूर येथे २०१६ ते मार्च २०१९ या कालावधीत अपर पोलिस अधिक्षक म्हणून चंद्रपूर येथे सेवा दिली.  आपण नक्षली भागात सहावर्षांपेक्षा जास्त अधिक काळ सेवा दिली आहे.

 कोरोना विषाणू संसर्ग कालावधीतील ४ लॉकडाऊनमध्ये आपण स्वयंशिस्त शिकलो. आता अनलॉक कालावधीत त्या शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना संक्रमण रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी नसून कर्तव्य आहे. कुणीही एकटा कोरोनाचा प्रसार थांबवू शकत नाही.

भीती पोलिसांची नाही, कोरोनाची बाळगा ?कोरोना या विषाणू संसर्गामुळे जगभर हाहाकार माजला आहे. खामगाव आणि परिसरातही कोरोनाचे थैमान वाढत आहे. नागरिकांची बेफिकीर वृत्ती आणि  दुर्लक्षामुळे या रोगाचा  प्रसार वाढण्यास मदत होत आहे. काही नागरिकांकडून दक्षता पाळली जात आहे. मात्र,  काही नागरिक पोलिसांचा धाक म्हणून नियम पाळत आहेत. मात्र, भीती आणि धाक पोलिसांचा नव्हे तर कोरोनाचा बाळगला हवा. तसेच ‘एसएमएस’ या प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. ‘एसएमएस’ मध्ये पहिला एस म्हणजे सोप, एम म्हणजे मास्क आणि तिसरा एस म्हणजे शारिरीक अंतर होय.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत