बुलडाणा : मिनी मंत्रालय म्हणुन ओळखल्या जाणार्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी रविवार २१ सप्टेंबर रोजी निवडणुक होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठीभेठी झाल्या असुन अध्यक्षपद निश्चीत असल्याने आता उपाध्यक्षपदासाठीच राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुक समोर असताना पदाधिकार्यांना मुदत वाढ मिळण्याची शक्यता संपल्यावर सदस्यांना पदाधिकारी निवडीचे वेध लागले होते. काँग्रसकडे अध्यक्षपद असुन यावेळी हे पद आरक्षीत असल्याने पदासाठीची स्पर्धा संपली आहे. उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे या पदासाठी जोरदार लॉबींग सुरू झाली आहे. दिनकरराव देशमुख, पांडूरंग खेडेकर, यांचेसह शारदा दंदाले, अरूणा गव्हाड यांची नावे शर्यतीत असुन विद्यमान सभापती सायली सावजी यांनी डोगणावात मेळावा घेऊन पुन्हा आपला दावा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. उपाध्यक्ष पद देतांना राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेतील राजकीय समिकरणे डोळयासमोर ठेवणार आहे.
राष्ट्रवादीत उपाध्यक्षपदाची रस्सीखेच
By admin | Updated: September 19, 2014 23:21 IST