शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

 हिमाचल प्रदेशात अडकलेले नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:17 IST

इयत्ता नववीचे 21 विद्यार्थी बारा मुली व नऊ मुले असे मायग्रेशन योजनेअंतर्गत शिक्षणासाठी हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गेले होते.

 बुलडाणा :  शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी मायग्रेशन योजनेअंतर्गत हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गेलेले होते. लाॅक डाऊन नंतर हे सर्व विद्यार्थी तेथे अडकून पडले होते. पालकमंत्री डाॅ.  राजेंद्र शिंगणे, जिल्हा प्रशासन व सर्वांच्या प्रयत्ना मुळे हे विद्यार्थी साथ मे रोजी सकाळी शेगाव मध्ये दाखल झाले आहेत.शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववीचे 21 विद्यार्थी बारा मुली व नऊ मुले असे मायग्रेशन योजनेअंतर्गत शिक्षणासाठी हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गेले होते. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र 25 मार्च 2020 रोजी संपले होते. मात्र लाॅक डाऊन 'मुळे वाहतूक व्यवस्था नसल्याने या सर्व विद्यार्थ्यांना घरी कसे आणायचे असा प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधी समोर होता.  आठ दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाने एक खास आदेश काढून अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी पोहोचविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने देखील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त करून सदर विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्या चा निर्णय घेतला होता.  त्यानंतरचंबा येथून हे विद्यार्थी हिमाचल प्रदेश मधून राजस्थान पर्यंत एका खासगी बस द्वारे आणण्यात आले. तर शेगाव येथून जिल्हा प्रशासनाने एसटी महामंडळाची एक शिवशाही बस सदर विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठविली होती. ही गुरुवारी सकाळी  सात वाजता सर्व विद्यार्थी व शिक्षकांना घेऊन सुखरूप पोहोचली.    विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणी नंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे.   या या प्रक्रियेमध्ये पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी वारंवार प्रयत्न करून शासनापर्यंत प्रशासनापर्यंत हा विषय पोहोचविला होता.  सोळाशे किलोमीटर प्रवास करून हे सर्व विद्यार्थी स्व जिल्ह्यात सुखरूप पोहोचले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी