शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

दुष्काळ निर्मूलनासाठी दिव्यदृष्टीतून 'नरेंद्र' देतोय जलसंधारणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 18:02 IST

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिने-अभिनेता आमिर खान राज्यात जलसंधारणाची चळवळ राबवित आहे.

- योगेश फरपटखामगाव : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिने-अभिनेता आमिर खान राज्यात जलसंधारणाची चळवळ राबवित आहे. याच चळवळीचा एक घटक असलेले अकोला-बुलडाणा जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड हे डोळ्यांच्या माध्यमातून संवाद साधून युवकासह नागरिकांना जलसंधारणाचे धडे देण्याचे काम प्रभावीपणे करताना दिसत आहेत. आतापर्यंत बोलक्या बाहुल्यांचा खेळ बहुतांश लोकांनी पाहिला असेलच पण बोलक्या डोळ्यांचा संवाद ऐकण्यासाठी ग्रामीणच नव्हे शहरी भागात सुद्धा उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र काकड हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असताना खामगाव येथे लोकमतशी संवाद साधला.मानवी अवयवांपैकी डोळे हा सर्वात प्रभावशाली अवयव आहे. डोळे हा प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करणारा अवयव आहे. जी गोष्ट आपण बोलू शकत नाही. ती डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. राग, प्रेम, आपुलकी, भावना ह्या डोळ्यांतून व्यक्त होत असतात. खळखळणा-या हास्यासोबत औजस्वी डोळे असले की निश्चितच मैफील जिंकता येते. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न चालले आहेत. विविधपणे प्रशिक्षण देताना ग्रामीण व्यक्ती हीच या चळवळीचा खरा पाया आहे. ही चळवळ लोकांनी आता आपली मानली आहे.या चळवळीच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे. तशा प्रकारची उदाहरणे महाराष्ट्राभर पाहायला मिळत आहेत. जलसंधारणासोबत मनसंधारण व्हावं यासाठी ग्रामीण तथा शहरी भागातही कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील शाळा व शहरी भागातील महाविद्यालयात वेगळ्या आशेने डोळ्यांच्या माध्यमातून जनसंवाद साधला जात आहे. आणि तो साधतो आहे नरेंद्र. सत्यमेव जयते वॉटर कप पाणी फाऊंडेशनचे अकोला व बुलडाणा जिल्हा समन्वयक म्हणून नरेंद्र काकड काम पाहतोय. हसता हसता डोळ्यांच्या कला ओलावून टाकणारे नयनकटाक्ष व जलसंधारण चळवळीत पाणलोटबद्दलचे विविध उपचार नरेंद्र चक्क आपल्या डोळ्यांनी सांगतोय.शेततळे, दगडी बांध, जाळीचा बांंध, माती नाला बांध, विहीर पुनर्भरण, कंटूर बांध, शोषखड्डे, वृक्षलागवड इत्यादीची माहिती नरेंद्र चक्क आपल्या डोळ्यांनी देतोय. पाणलोट उपचाराबाबत साध्या आणि सोप्या भाषेत डोळ्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहे. महाविद्यालयीन तरुण असो की, गावातील ग्रामस्थ यालाही डोळ्याची भाषा आपली वाटते व सहजपणे ते उपचार स्वीकारतात. आतापर्यंत अकोला व बुलडाणा जिल्ह्यात अनेक गावामध्ये जलसंधारणाची चळवळ राबविली आहे.