लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : अवैध रेती उपसा करणार्या रेती माफियांनी प्रातर्विधीस गेलेल्या तरुणीला हटकल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दाखल तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तब्बल पन्नास आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. त्यापैकी १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, गुरुवारी आरोपींना नांदुरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपींना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, नांदुरा शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.याबाबत पवन दिनकर अवचार (वय १८) रा. जळगाव जामोद ह.मु.पंचवटी याने नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, तो मित्रांसोबत पंचवटी परिसरात क्रिकेट खेळत असताना शेजारील एका तरुणीने अवैध रेती माफिया रेतीचा उपसा करीत असताना हटकत असल्याचे सांगितले. याबाबत फिर्यादी व त्याचे मित्र त्या रेती माफियांना विचारणा करण्यासाठी गेले असता ते निघून गेले; मात्र काही वेळानंतर अंदाजे ३0 ते ४0 मुले कुरेशी मोहल्याकडून हातात काठी व इतर साहित्य घेऊन आले व त्यांनी शिवीगाळ करून लोखंडी पाइपने फिर्यादीला मारहाण केली व त्यानंतर या जमावाने पंचवटी भागात हैदोस घालीत महिलांना मारहाण केली व दुचाकी वाहने, किराणा दुकान व घरांचे नुकसान केले. या तक्रारीवरून २९ आरोपींविरुद्ध पोलिसांनी विविध गंभीर कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. यापैकी शे.जाकीर शे.हाशम, शे.साजीद शे.कालू, शे.सईद स.शेख आसीम, शे.रिजवान शे.तस्लीन, शे.शाहीद ऊर्फ सल्लू, शे.चांद कुरेशी, शे.मोहसीन शे.कालू सर्व रा. कुरेशी मोहल्ला तसेच मो.वसीम शे.निसार व जाकीर खान आसीफ खान रा.पंचवटी अशा आठ आरोपींना अटक केली आहे. शे.शहीद शे.कुरेशी रा.कुरेशी मोहल्ला याने तक्रार दिली, की तो मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याकरिता गेला असताना राजू मगर व इतर २0 जणांनी काठय़ा व लोखंडी पाइपने मारहाण केली. यापैकी राजू मगर, मनीष राखोंडे, अमोल डहाके व श्रीकृष्ण तेलकर या चौघांना पोलिसांनी अटक केली. सर्व २१ आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ८ जानेवारीपर्यंत न्यायालयाने आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. सध्या शहरात तगडा पोलीस बंदोबस्त असून, तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचे धरपकड सत्र सुरू आहे.
नांदुरा : दोन गटातील हाणामारी; ५0 जणांविरुद्ध गुन्हा; १२ अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:33 IST
नांदुरा : अवैध रेती उपसा करणार्या रेती माफियांनी प्रातर्विधीस गेलेल्या तरुणीला हटकल्याने दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी दोन्ही गटांकडून दाखल तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तब्बल पन्नास आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. त्यापैकी १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, गुरुवारी आरोपींना नांदुरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या आरोपींना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान, नांदुरा शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
नांदुरा : दोन गटातील हाणामारी; ५0 जणांविरुद्ध गुन्हा; १२ अटकेत
ठळक मुद्देपरस्परविरोधी तक्रारीवरून कारवाई