शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी नावे आधार क्रमांकाशी संलग्न करावे- जिल्हाधिकारी

By admin | Updated: March 17, 2015 01:04 IST

बुलडाणा येथे १२ एप्रिल रोजी विशेष शिबिराचे आयोजन.

बुलडाणा : मतदार यादीमध्ये बोगस मतदारांना आळा बसण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार आधार क्रमांक संलग्नीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ मार्च ते ३१ जुलै २0१५ दरम्यान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आयोगाने आधार क्रमांक संलग्नीकरण करण्यासाठी विविध पर्याय ठेवले आहे. एसएमएस, निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, मतदान केंद्रावर विहीत नमुन्यात भरून द्यावयाचे प्रपत्र आदींच्या माध्यमातून आधार क्रमांकाचे संलग्नीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी केले. मतदार आधार संलग्नीकरणाच्या मोहिमेसंदर्भात १६ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे, उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे आदी उपस्थित होते. ज्या नागरिकांनी आधार कार्ड अद्यापही काढले नाही, त्यांनी त्वरित काढून आपल्या मतदार ओळखपत्रासह आधार संलग्नीकरण करण्याचे सांगितले. जिल्ह्यात ६५ आधार कार्ड काढण्याचे संयंत्र कार्यरत आहेत. या संयंत्राद्वारे आधार क्रमांक त्वरित प्राप्त करून घ्यावा. ही सेवा संपूर्णत: नि:शुल्क आहे. यासाठी कुणी रकमेची मागणी करीत असल्यास त्याची तक्रार संबंधित तहसीलदार, पोलीस स्टेशनला करावी. जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार ९ लाख ९0 हजार २२५ असून, स्त्री मतदार ८ लाख ८६ हजार २४५ आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण १८ लाख ७६ हजार ४७४ मतदार आहेत. आधार क्रमांक व मतदार ओळखपत्र क्रमांक संलग्नीकरणासाठी १२ एप्रिल २0१५ रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, यासाठी संलग्नीकरणाची जनजागृतीची मोहीम ३१ जुलै २0१५ पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात येणार्‍या काळात ५२९ ग्रा.पं. निवडणुका होणार आहेत. यासाठी संलग्नीकरण झालेल्या मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.