शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नळगंगा प्रकल्पामुळे दुष्काळावर मात!

By admin | Updated: April 6, 2016 00:17 IST

मोताळा तालुक्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ‘नो प्रॉब्लेम’.

मोताळा (बुलडाणा): अत्यल्प पर्जन्यामुळे तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असली, तरी जिल्हय़ातील सर्वात मोठा असलेल्या नळगंगा प्रकल्पात ३१ ऑक्टोबर २0१६ पर्यंत पुरेल इतका उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मोताळा-मलकापूर तालुक्यातील ४0 ते ४५ गावांचा पाणीप्रश्न सहा महिन्यापर्यंत मिटला असून, दुष्काळाची झळ काही प्रमाणात कमी झाली आहे. तालुक्यातील नळगंगा प्रकल्पातून मोताळा व मलकापूर तालुक्यातील जवळपास ४0 ते ४५ गावांना पाणीपुरवठा केला जातो. ३0 कि. मी. कालव्याची लांबी असलेल्या या धरणामधील जलाशयाची पातळी २८४.३0 मीटर आहे. सद्यस्थितीत ६.७७ दलघमी. (९.७६ टक्के) इतका उपयुक्त पाणी साठा धरणात उपलब्ध आहे. तालुक्याला वर्षभरासाठी सरासरी ६८८.६ मिमी पावसाची आवश्यकता असते. नळगंगा धरणातून दरवर्षी ४ दलघमी. पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित केल्या जातो. यावर्षी १ नोव्हेंबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत २. ७0 दलघमी. पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित केलेला आहे. आज रोजी आरक्षित जलसाठा ६. ७७ दलघमी. इतका असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असून, सिंचनासाठी शेतकर्‍यांना पाणी बंद केलेले आहे. परतीच्या पावसाची अपेक्षा असताना पावसाने दगा दिल्याने सिंचनासाठी शेतकर्‍यांना पाणी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.