वाशिम: एका ४0 वर्षीय विवाहित महिलेने आजाराला कंटाळून धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. शहरातील योजना कॉलनी (सिव्हिल लाईन) परिसरात वास्तव्य करणारे नायब तहसीलदार आर.बी. डाबेराव यांच्या पत्नी ज्योती डाबेराव यांना पोटदुखीचा आजार होता. या आजाराला कंटाळून रविवारी सकाळी वाशिमहून अकोल्याकडे जाणार्या पॅसेंजर रेल्वेखाली ज्योती डाबेराव यांनी उडी घेऊन आत्महत्या केली.या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली.
नायब तहसीलदाराच्या पत्नीची आत्महत्या
By admin | Updated: May 9, 2016 01:59 IST