शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथील नाफेड केंद्रावर उडीद खरेदीत कोटींचा घोटाळा; ‘स्वाभिमानी’ची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:48 IST

बुलडाणा : चिखली येथील नाफेड  केंद्रावर उडीद विक्री करणार्‍यांची सखोल चौकशी करून दोषींना  गजाआड करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल,  असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली.

ठळक मुद्देव्यापारी, दलाल, काही पुढार्‍यांचा सहभाग असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकर्‍यांच्या नावाने व्यापार्‍यांनी मोठय़ा प्रमाणात चिखली येथील नाफेड  केंद्रावर उडीद विक्री करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. यामध्ये व्यापारी,  दलाल व काही राजकीय महाठगांचा सहभाग असून, शेतकर्‍यांना माहीत नसतानाही  त्यांच्या सात-बारावर उडीद विक्री करणार्‍यांची सखोल चौकशी करून या दोषींना  गजाआड करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल,  असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे  माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली.

जिल्हा उपनिबंधकांना दिलेल्या तक्रारीत रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे की, चिखली  येथील नाफेड केंद्रावर व्यापार्‍यांनी मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार केला. ज्या शेतकर्‍यांनी  बियाणे महामंडळाकडून बी घेऊन पेरणी केली, त्यासंदर्भात अहवाल मंडळ कृषी  अधिकार्‍यांनी बीज प्राधिकरण अधिकार्‍यांनाही दिला आहे. त्यावर सोयाबीन  महामंडळाला दिल्यावरही त्याच सात-बारावर नाफेडला उडीद दिला आहे. वास्तविक  शेतकर्‍यांनी महामंडळाकडून जे सोयाबीनचे बियाने घेतले त्या फाउंडेशन प्लॉटमध्ये आं तरपीक घेता येत नाही. शेतकर्‍यांनीसुद्धा तसे पीक लावले नाही. अनेक शेतकर्‍यांनी  सोयाबीनचे उत्पन्नदेखील महामंडळालाच दिले त्यापोटी २ हजार ५00 रुपये प्रति  िक्वंटलप्रमाणे सोयाबीनची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली आहे. त्यावरून  सदर शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरल्याचे सिद्ध होते; परंतु त्याच सात-बारावर त्याच शे तकर्‍यांनी उडिदाचे उत्पन्न घेतल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच सात-बारावर व्यापार्‍यांनी  तुरीचेसुद्धा ऑनलाइन बुकींग करून ठेवल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला  आहे, तसेच महामंडळाचे बियाणे पेरणार्‍या सोयाबीन उत्पादकांचे सात-बारे व्यापार्‍यांनी  वापरून त्याच सात-बार्‍यावर उडिदाची विक्री चिखली नाफेड केंद्रावर केल्याचे स्पष्ट हो ते. बियाने महामंडळाची यादी व नाफेड खरेदी केंद्रावर उडीद विक्री केलेल्या शेतकर्‍यांची  यादी, तुरीसाठी आगावू ऑनलाइन बुकींग केलेली यादी या सर्व याद्यांची तपासणी केली  तर झालेला सर्व घोटाळा उघडकीस येऊन व्यापारी, दलाल आणि काही राजकीय  पुढार्‍यांचा खरा चेहरा समोर येईल. यासाठी सदर घोटाळ्याची सक्षम व राजकीय  दबावाला बळी न पडणार्‍या अधिकार्‍यांकडून सखोल चौकशी दोषी व्यापार्‍यांची देयके  रोखून ठेवा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

आठ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनयेत्या आठ दिवसात दोषी व्यापार्‍यांवर फौजदारी कारवाई करुन त्यांना कडक शिक्षा  करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरून  आंदोलन छेडेल, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दिलेल्या तक्रारीत दिला आहे. 

टॅग्स :chikhali roadचिखली रोडbuldhanaबुलडाणा