शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डचा साडेचार हजार कोटींचा जिल्हा पतआराखडा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 13:24 IST

  बुलडाणा : नाबार्डचे पुणे येथील क्षेत्रीय कार्यालय आणि तंत्र अधिकार्याच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्ह्याचा २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी चार ...

 

बुलडाणा: नाबार्डचे पुणे येथील क्षेत्रीय कार्यालय आणि तंत्र अधिकार्याच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्ह्याचा २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी चार हजार ५५० कोटी रुपयाचा दिशादर्शक पतआराखडा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जाहीर करण्यात आला असून पीक कर्ज आणि शेती मुदती कर्जासाठी यामधअये ७६ टक्के अर्था त तीन हजार ४५७ कोटी रुपयांची तर उद्योग व्यवसाय आणि शासकीय योजनांचा समावेश असलेल्या इतर कर्जांसाठी यात एक हजार ९३ कोटी ३५ लाख (२४ टक्के) तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, पीक कर्ज आणि उत्पादनाचा विचार करता यंदाच्या या पतआराखड्यात ३० टक्के वाढ करून हा पतआराखडा जाहीर करण्यात आला आहे. प्रभारी जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस., अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्हाडे आणि जिल्ह्यातील बँकर्सच्या उपस्थितीत हा दिशादर्शक पतआराखडा जिल्हाधिकार्यांच्या दालनात नाबार्डे विकास प्रबंधक सुभाष बोंदाडे यांनी मांडल्यानंतर तो जाहिर करण्यात आला. यामध्ये पुढील वित्तीय वर्षासाठी शेती पीक कर्जासाठी दोन हजार ६६१ कोटी ७२ लाख आणि शेती मुदती कर्जासाठी ७९५.३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून उद्योग व व्यवसायिक कर्जासाठी ३१८ कोटी २९ लाख आणि शासकीय योजना तता इतर व्यावसायिक कर्जे की ज्यामध्ये मुद्रा लोणचाही समावेश आहे त्यासाठी ७७५ कोटी  सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील वर्षात खरीपाचे पाच लाख ११८ हेक्टरवर पेरणीचे संभाव्य उदिष्ठ असून सोयाबीन दोन लाख ७९ हजार ५८२, कापूस एक लाख १३ हजार ७४१, तूर ५२ हजार ६३७, उडीद, मूग २९ हजार ९१४, ज्वारी-मका २२ हजार ४९६ आणि इतर पिके एक हजार ७४८ हेक्टरवर घेण्यासंदर्भातील संभाव्य नियोजन अनुषंगीक आराखड्यात आहे. शेती मुदतीकर्जासाठीचे नियोजन पुढील वित्तीय वर्षाच्या अनुषंगाने सिंचन व मुलभूत सुविधा कर्जासाठी ३८८ कोटी रुपये, यांत्रिकीकरणासाठी ५३ कोटी ७३ लाख, फळबाग व शेती सुधारणा कर्जासाठी ८८.२६ कोटी, पशुपाल व मत्स्य व्यवसाय मुदती कर्जासाठी ११५ कोटी, धान्य गोदाम, शीतगृह, बीज प्रक्रिया रासायनिक व सेंद्रीय खते तथा शेती विकासासाठी ११३ कोटी, शेत माल प्रक्रया उद्योगासाठी ३६ कोटी रुपयांची या संभाव्यता युक्त ऋण योजनेतंर्गत तरतूद करण्यात आली आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा