शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

‘माय शिवबाची’ व्हिडिओ अल्बमचे प्रदर्शन १२ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:22 IST

चिखली : ‘माय शिवबाची’ हा बहुप्रतीक्षित मराठी व्हिडिओ अल्बम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी प्रदर्शित केल्या जाणार आहे. तालुक्यातील गोद्री येथील राहुल साळवे या युवकाच्या गीताचा समावेश असलेल्या या अल्बमच्या ऑफिशियल व्हिडिओकडे रसिक वर्ग नजर लावून आहेत.

ठळक मुद्देगोद्री येथील युवकाच्या गीताचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : ‘माय शिवबाची’ हा बहुप्रतीक्षित मराठी व्हिडिओ अल्बम राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीदिनी १२ जानेवारी रोजी प्रदर्शित केल्या जाणार आहे. तालुक्यातील गोद्री येथील राहुल साळवे या युवकाच्या गीताचा समावेश असलेल्या या अल्बमच्या ऑफिशियल व्हिडिओकडे रसिक वर्ग नजर लावून आहेत.उन्मेष तायडे फिल्म्स व ऑरेंज म्युझिकच्या विद्यमाने प्रदर्शित होणारा मराठी संगीत अल्बम ‘माय शिवबाची’ विषयीची माहिती ग्रोदी येथील राहुल साळवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अवघ्या मराठी मनाला वेड लावणार्‍या या गाण्याचे बोल राहुल साळवे यांनी लिहिले आहे, तर अण्णा सुरवाडे यांनी गायले आहे. या अल्बमचे संपूर्ण शूटिंग पुणे परिसरात झाले असून, सहनिर्माते सचिन पाटील यांनी निर्मितीसाठी जोरदार मेहनत घेतली आहे. ‘रशके कमर’च्या तुफान यशानंतर उन्मेष तायडे यांचा ‘माय शिवबाची’ हा अलबम सध्या युट्युबवर धुमाकूळ घालत आहे. अप्पा नेवे यांनी संगीतबद्ध केलेल्या या अल्बममध्ये उन्मेष तायडे यांच्या मुख्य भूमिकेने जिवंतपणा आणला आहे, तर अल्बम प्रमोशनसाठी मनोहर तायडे व संजय भैसे यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून, बर्‍याच संघर्षानंतर १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जिजाऊ जयंतीदिनी प्रदर्शित होणार्‍या या अल्बमच्या ऑफिशियल व्हिडिओकडे रसिक वर्ग नजर खिळवून आहे. तत्पूर्वी अल्बमचा प्रोमो, ट्रेलर व ऑडिओ ऑरेंज म्युझिकच्या ऑफिशियल युट्युब चॅनलवर उपलब्ध असून, बहारदार असे हे गाणे जिजाऊ जयंती गाजवणार, यात तिळमात्न शंका नाही, असा विश्‍वासदेखील साळवे यांनी व्यक्त केला आहे. सिंदखेडराजा येथे १२ जानेवारी रोजी मासाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावेळी राज्यासह इतर राज्यातील जिजाऊ भक्त मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. या पृष्ठभूमीवर राहुल साळवे यांचा ‘माय शिवबाची’ हा अल्बम येत असल्यामुळे राहुल साळवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा