शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषदेच्या ‘पत्रक’बाजीमुळे खामगावात खळबळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:30 IST

१२ प्रश्न आणि त्यांची उत्तरे आरोग्य विभागाने लिखित स्वरूपात देत, शहराचा गुणांक वाढविण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले.

-  अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ सर्वेक्षणात सकारात्मक प्रतिसादासाठी एक पत्रक जारी करण्यात आले. यात संभाव्य १२ प्रश्न आणि त्यांची उत्तरे आरोग्य विभागाने लिखित स्वरूपात देत, शहराचा गुणांक वाढविण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. या पत्रकामुळे खामगावात एकच खळबळ उडाली असून विरोधी पक्षाने सत्ताधारी अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे.स्वच्छ सर्वेक्षण-२०२० अंतर्गत केंद्रीय समितीच्यावतीने खामगाव शहराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आगामी काही दिवसांत या सर्व्हेक्षणाच्या अनुषंगाने खामगाव पालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये शहर स्वच्छता समन्वयाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागातील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता राखण्यासाठी एक अ‍ॅक्शन प्लानही पालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केला आहे. इतकेच नव्हे तर स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत केंद्रीय समितीद्वारे विचारण्यात येणाºया संभाव्य १२ प्रश्नांचे एक पत्रक शहरात वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये संभाव्य प्रश्नांची उत्तरे तयार करून देण्यात आली असून स्वच्छ सर्वेक्षणात शहराला जास्तीत जास्त गुण मिळवून देण्यासाठी पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पालिकेचा हा प्रयत्न नागरिकांची दिशाभूल करणारा आणि खोटं बोलण्यास प्रोत्साहित करणारा असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत जनजागृतीचे पालिकेचे प्रयत्न आहेत. संभाव्य प्रश्नावली आणि त्यांची संभाव्य उत्तरे असलेले पत्रक जनजागृतीसाठी वितरीत केले आहे. मात्र, संभाव्य उत्तर देण्यासाठी कोणतेही बंधन तसेच आग्रह धरलेला नाही.- प्राजक्ता पांडेआरोग्य पर्यवेक्षीका, नगर परिषद, खामगाव.शहरात ठिकठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा वाजलेला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना भावनिक आवाहन करून खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त करणे योग्य नाही. पालिकेतील अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या हातचे बाहुले बनल्यानेच अनेक नियमबाह्य प्रकार पालिकेत सुरू आहेत.- सरस्वती खासने स्वीकृत नगरसेविका, काँग्रेस, खामगाव.

 

टॅग्स :khamgaonखामगाव