शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

खामगावच्या बाजारात मुगाची आवक वाढली!

By admin | Updated: September 24, 2016 03:20 IST

खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची आवक वाढली.

खामगाव(जि. बुलडाणा), दि. २३- यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुगाचे चांगले उत्पन्न झाले आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये मूग विक्रीसाठी आणणार्‍या शेतकर्‍यांची गर्दी वाढत चालली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळी परिस्थितीने शेतकरी हवालदिल झाला आहे. अत्यल्प पावसामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न तीन वर्षांपासून निघालेले नाही. नगदी पीक असलेल्या मुगाला मागील दोन वर्षांत एकरी क्विंटलपर्यंतच उत्पन्न झाले. त्यावेळी बाजारात मुगाला भाव भरमसाठ होता. मात्र मुगाची आवकच नसल्याने शेतकर्‍यांचा फायदा झाला नाही. सन २0१४ व २0१५ या दोन्ही वर्षात खरीप हंगामात शेतकर्‍यांना उत्पन्नाचा फटका बसला, नेमक्या याच वर्षात मुगाचे भाव वाढलेले होते. दरम्यान, यावर्षी मुगाचे चांगले पीक आहे. खरीप हंगामात मुगाचे पीक बाजारात येताच व्यापार्‍यांनी मुगाचे भाव पाडले आहेत. मुगाच्या खरेदीसाठी शासनाने ५२२५ रुपये हमीभाव जाहीर केला. या हमीभावापेक्षा कमी भावाने मुगाची खरेदी होत असताना शासनाने शेतकर्‍यांच्या तक्रारीवरून हमीभावाने मुगाची खरेदी करण्याची अट घातली. तेव्हा ४८२५ या हमीभावाने खामगाव बाजार समितीत मुगाची खरेदी करण्यात आली. असे असतानाही मुगाचा दर्जा ठरवून पाच हजारांपेक्षा कमी भाव शेतकर्‍यांना दिल्या जात आहे. खामगाव बाजार समितीने शेतकर्‍यांचे हित लक्षात घेता कमी भावाने मूग खरेदी न करण्याबाबत व्यापार्‍यांना बजावले आहे. यापुढेही बाजार समितीने खरेदीवर प्रत्यक्ष लक्ष ठेवून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये नऊ हजारांचा भावउत्पादन कमी तर भाव जास्त, असेच सूत्र बाजारामध्ये तीन वर्षांपासून पहावयास मिळत आहे. मागील दोन वर्षांत अत्यल्प पावसामुळे मुगाचे उत्पादन घटले. मात्र, बाजारात मुगाचे भाव वाढले होते. खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन २0१४ मध्ये सप्टेंबर महिन्यात मुगाला ७१२५ रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक भाव, तर सन २0१५ मध्ये याच महिन्यात ९१५0 रुपये सर्वाधिक भाव मिळाला आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी मुगाला मिळत असलेला भाव खूपच कमी आहे. शेतकर्‍यांना पैशाची गरज असल्याने नाईलाजास्तव मूग विकावा लागत आहे.मागील तीन वर्षांतील मुगाची आवक (१५ ते २२ सप्टेंबरदरम्यान)सन आवक (क्विंटलमध्ये)भाव (प्रतिक्विंटल)२0१४              ४७0                  ७१२५२0१५             १२0५                 ९१५0२0१६              ५४१९                ५५५0