शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis : जीव वाचविण्यासाठी गमवावा लागला डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 11:54 IST

Mucormycosis : म्युकरमायकोसिसचा आजार होऊन एक उजवा डोळा निकामी झाल्याने तो काढून टाकावा लागल्याची वेळ एका ६१ वर्षीय रुग्णावर आली. 

- मनोज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारादरम्यान रेमडेसिविर इंजेक्शनही देण्यात आली. रुग्णाने कोरोनावर मातही केली. नंतर मात्र डोळ्यासमोर अंधूकपणा जाणवायला लागल्याने चाचणीअंती म्युकरमायकोसिसचा आजार होऊन एक उजवा डोळा निकामी झाल्याने तो काढून टाकावा लागल्याची वेळ एका ६१ वर्षीय रुग्णावर आली. सद्य:स्थितीत या रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. ही घटना मलकापुरात दीड महिन्याआधीच घडली, तरी या घटनेसंदर्भात कसलीच नोंद नसल्याने आरोग्य यंत्रणा मात्र अनभिज्ञ आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे जुन्या गावातील एका ६१ वर्षीय रुग्णास ३ मार्च रोजी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान रेमडेसिविरची  इंजेक्शन त्यांना देण्यात आली. परंतु डोळ्याचा त्रास होत असल्याची बाब रुग्णाच्या नातेवाइकांनी डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली.   कोरोनावर मात करीत ते घरी परतले. मात्र चार ते पाच दिवसात त्यांची तब्येत बिघडल्याने व  डोळ्यासमोर अंधुकपणा जाणवायला लागला. अहवालावरून त्यांच्या डोळ्यात काळी बुरशी दिसून आली.  १ एप्रिल रोजी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रीतेश टावरी यांच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करून निकामी झालेला उजवा डोळा काढून टाकण्यात आला. ही घटना तब्बल दीड महिना  लोटला तरी आरोग्य यंत्रणेकडे  त्याची नोंद नाही.

कोरोनानंतर वाढला मधुमेहाचा त्रासकोरोना आजारावर वापरण्यात येणाऱ्या औषधांचे दुष्परिणाम आता पुढे येऊ लागले आहेत. या औषधांमुळे रुग्णांच्या थेट डोळ्यावर व शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम दिसून येत आहे. मलकापुरातील रुग्णाला कोरोनाची बाधा होण्यापूर्वी मधुमेहाचा कसलाही त्रास नव्हता. तरीही उपचारानंतर रुग्णाची म्युकरमायकोसिसमुळे हा त्रास सुरू झाला आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसMalkapurमलकापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या