शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएसएसी आणि रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:34 IST

संदीप वानखडे बुलडाणा : एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांसमाेर पेच निर्माण झाला ...

संदीप वानखडे

बुलडाणा : एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा व रेल्वेची परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांसमाेर पेच निर्माण झाला आहे. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांंवर या परीक्षा हाेणार असल्याने विद्यार्थ्यांना दाेनपैकी एकच परीक्षा देता येणार आहे. दाेन्ही परीक्षा २१ मार्च राेजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर हाेणार आहेत.

गत काही महिन्यांपासून एमपीएससीच्या परीक्षांचा सावळागाेंधळ सुरू आहे. आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षा वेगवेगळ्या कारणांमुळे पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीने राज्येसवा पूर्व परीक्षा २१ मार्च राेजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा रेल्वेची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. रेल्वेच्या वतीने विविध पदांसाठी देशभरात विविध केंद्रांवर पाच टप्प्यात परीक्षा घेण्यात येत आहेत. येत्या २१ मार्चलाही देशभरातील विविध केद्रांवर ही परीक्षा हाेणार आहे.

रेल्वेच्या परीक्षा पूर्वनियाेजित

रेल्वेच्या ३२ हजार २०८ जागांसाठी पाच टप्प्यात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. सध्या पाचव्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहेत. देशभरातील १९ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. रेल्वेची पूर्व नियाेजित परीक्षा असतानाही एमपीएससीनेही त्याच तारखेला परीक्षा घेण्याची घाेषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील हजाराे विद्यार्थी एका परीक्षेपासून वंचित राहणार आहेत.

लाॅकडाऊनचा विद्यार्थ्यांना बसणार फटका

काेराेना संसर्ग वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आले आहे. एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पाेहचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तसेच हाॅटेल बंद राहणार असल्याने घरच्या शिदाेरीवरच परीक्षा द्यावी लागणार आहे. लाॅकडाऊन असलेल्या शहरामध्ये राहण्याची साेय हाेणार नसल्याने परीक्षेला वेळेवर पाेहाेचण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना बसला भुर्दंड

लाॅकडाऊननंतर शहरांमध्ये अभ्यास करण्यासाठी गेलेले विद्यार्थी गावी परतले आहेत. या विद्यार्थ्यांनी १४ मार्चला हाेणाऱ्या परीक्षेला जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षणही केले हाेते. मात्र, ऐनवेळेवर एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना नाहकचा भुर्दंड बसला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या लाॅकडाऊनमुळे २१ मार्चला हाेणाऱ्या परीक्षेला केंद्रावर पाेहाेचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.