शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानदारांना विमा संरक्षण देण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:57 IST

प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देअनुषंगीक प्रस्ताव वित्तविभागाकडे पाठविण्यात आला आहे.व्हीसीमध्ये अन्न व पुरवठा मंत्र्यांकडून संकेत.

बुलडाणा: लॉकडाऊन काळात पुरवठा विभागानेही स्वस्त धान्य दुकानावरून धान्य वितरण वाढविलेले असतानाच या दुकानदारांचा थेट धान्य घेणाºया कुटुंबांशी संपर्क येत असल्याने दुकानदारांनाही विमा संरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने सकारात्मक पावले टाकली असून त्या संदर्भातील प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.नेमका किती रकमेचा हा विमा काढल्या जाऊ शकतो याबाबत स्पष्टता नसली तरी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या व्हीसीमध्ये त्याबाबत सुतोवाच केले आहे. या व्हीसीमध्ये प्रामुख्याने अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्यासह अन्य अधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ५३६ रेशन दुकानदार असून धान्य वितरणावेळी जिल्ह्यातील साडेपाच लाख कुटुंबांशी संपर्क येतो. हे धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात असले तरी धान्य वितरणावेळी येणारा थेट संपर्क पाहता या रेशन दुकानदारांनाही विमा कवच दिले जावे अशी मागणी जोर धरत होती. कोरोना साथीच्या काळात अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना विमा संरक्षण दिल्या जात असताना रेशन दुकानदारांनाही त्याचा लाभ व्हावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दि. दा. पाटील यांनी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांकडे केली होती. त्या पृष्ठभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले हे संकेत महत्त्वपूर्ण म्हणावे लागले. यासंदर्भात १७ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने अनुषंगीक वृत्त प्रकाशीत केले होते.

पुरवठा विभागाच्या व्हीसीमध्ये चर्चाअन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांची बुधवारी व्हीसी घेण्यात आली. या व्हीसीमध्ये अनुषंगीक विषयान्वेय चर्चा झाली असता छगन भुजबळ यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. प्रसंगी पुढील महिन्यात यासंदभा त निर्णय होण्याची शक्यता असून वित्त विभाग याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते हे स्पष्ट होईल. मात्र यासंदर्भाने रेशन दुकानदारांपर्यंत माहिती पोहोचविण्याबाबतही सांकेतीकस्वरुपात सुचना दिल्या गेल्या असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.