शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिगावसाठी चार हजार कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 11:05 IST

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहा आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बुलडाणा: अमरावती विभागाचा सिंचन अनुशेष भरून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया जिगाव प्रकल्पासाठी राज्यपालांच्या निधी वाटपाच्या सुत्रामध्ये बदल  करून  विशेष तरतूद म्हणून येत्या तीन वर्षात चार हजार कोटी रुपये उपलब्ध करण्याच्या दृष्टीने मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सहा आॅगस्ट रोजी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.दरम्यान, यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने अनुषंगीक एक निवेदनही देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिगाव प्रकल्पातील अडचणी व हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या संदर्भाने ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव संजय घाणेकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादुरे, जलसंपदा सचिव अतुल कपोले, उपसचिव एम. ी. धरणे, जिगाव प्रकल्पाच्या धरण विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील चौधरी, जिगाव उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडलाचे कार्यकारी संचलाक जी. मो. शेख आणि पाटबंधारे विभागाचे बुलडाणा येथील अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर व्हीसीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.जिगाव प्रकल्पात येत्या दोन वर्षात अंशत: पाणी साठविण्याच्या दृष्टीने नियोजन करणे, जिगाव  प्रकल्पाच्या  उर्वरित किंमतीमध्ये मुख्यत- भुसंपादन व पुनर्वसनाची किंत असून यासाठी चार हजार कोटी रुपयांचा निधीची अवश्यकता, गावठाण पुनर्वसनाची कामे व नागरी सुविधा दर्जेदार करणे यासह अन्य काही मुद्द्यावर चर्चा झाली. प्रामुख्याने जिगाव प्रकल्पासाठी येत्या तीन वर्षात चार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याच्या मुद्द्यावर खुद्द जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीने राज्यपालांना प्रस्ताव देवून  विशेष तरतूद म्हणून निधी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येणार आहे. आगामी आठ दिवसात त्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.  दरम्यान जिगाव प्रकल्पामध्ये अंशत: पाणी साठा करण्यासाठी नदीपात्रात द्वारयुक्त अतिरिक्त सांडवा देणे गरजेचे असून याबाबतचा प्रस्तावही शासनास येत्या १५ दिवसात सादर करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करून तसा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गावठाणातील नागरी सुविधांची कामे करताना दर्जेदार व आदर्श पूनर्वसन करण्यात यावे, यासाठी वास्तूविशारदांकडून अनुषंगीक नकाशे तयार करून त्याप्रमाणे कामे करण्यास प्राधान्य देण्यात येणार  असल्याचे सुत्रांनी सांगितले. यासोबतच अन्य दोन मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली आहे.

१४ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गीजिगाव प्रकल्पातंर्गत १४ गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून पहिल्या टप्प्यात या कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील आठ गावांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न लवकरच मार्गी लागले. त्यामुळे येत्या दोन वर्षात प्रकल्पातंर्गत पाणी साठवून काही प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध करणेही शक्य होईल, असे सुत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे जिगाव संदर्भात झालेली ही बैठक सकारात्मक झाल्यामुळे प्रकल्पाच्या कामातील अडचणी व निधीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे संकेतही सुत्रांनी दिले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प