शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर विकासासाठी प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 11:16 IST

Lonar Sarovar News : भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲन्ड आर्किटेक्टच्या प्राध्यापकांनीही फेब्रुवारी महिन्यात लोणार सरोवराची पाहणी केली होती.

ठळक मुद्देविकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने निधीची आवश्यकता आहे. नव वर्षात यासंदर्भातील कामे मार्गी लागण्याची आस यंत्रणेला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोणार सरोवर विकासासाठी प्राधिकरण स्थापण्याच्या दृष्टीने विचारमंथन सुरू असून नागपूर खंडपीठानेही त्यासंदर्भाने यंत्रणेला सूचित केले आहे. दरम्यान भोपाळ येथील  स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲन्ड आर्किटेक्टला विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने निधीची आवश्यकता आहे. नव वर्षात यासंदर्भातील कामे मार्गी लागण्याची आस यंत्रणेला आहे.     सरलेले वर्ष कोरोना संसर्गाने व्यापून टाकले होते. त्याचाही फटका लोणार सरोवर विकास आराखड्याला बसला आहे. त्यामुळे सरलेल्या वर्षात सरोवर विकासाच्या दृष्टीने रखडलेली कामे नव वर्षात मार्गी लागण्याची चिन्हे आहे. दुसरीकडे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोणार सरोवर व परिसर विकासासाठी प्राधिकरण स्थापण्यात यावे, अशा सूचना खंडपीठाने यापूर्वी दिल्या आहेत. अनुषंगिक विषयान्वये जिल्हाधिकारी यांनी याबाबत अभिप्रायही मागविलेले आहेत. त्या अनुषंगाने आगामी काळात खंडपीठात माहिती सादर करण्यात येईल. प्राधिकरण स्थापन झाल्यास विकास आराखड्याच्या अंमलबजावणीस वेग येऊन थेट मंत्रालयीन स्तरावर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या संपर्कात यंत्रणा राहील व कामे मार्गी लागण्यास मदत मिळले, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. गुलाबी पाणी झाल्यामुळे लोणार सरोवर कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान चांगलेच चर्चेत आले होते. गेल्या वर्षी खंडपीठाच्या दोन न्यायमूर्तींनीही सरोवरास भेट देऊन एकंदर परिस्थितीची पाहणी केली होती. सोबतच लोणार सरोवराचे व्हीजन डॉक्युमेंटेशन करण्याच्या दृष्टीने तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी बैठक घेऊन यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. भोपाळ येथील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲन्ड आर्किटेक्टच्या प्राध्यापकांनीही फेब्रुवारी महिन्यात लोणार सरोवराची पाहणी केली होती. विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने भोपाळच्या या संस्थेला निधीची गरज आहे. त्या अनुषंगाने येत्या काळात प्रशासकीय पातळीवर हालचाली वेग घेतील असे लोणारचे तहसीलदार सैफन नदाफ यांनी सांगितले.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा