शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाच्या एकरी दरात सुसुत्रता आणण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 11:25 IST

Crop Loan राज्यस्तरीय तांत्रिक समिती जिल्हास्तरावरील पीककर्जाचे दर निश्चित करून ते जिल्हास्तरावर पाठविणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पीककर्ज दरातील तफावतीमुळे शेतकऱ्यांना तुलनेने कमी मिळत असलेले पीककर्ज पाहता यामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर तांत्रिक समितीने सुचविलेल्या एकरी पीककर्ज दराचे अवलोकन करून राज्यस्तरीय तांत्रिक समिती जिल्हास्तरावरील पीककर्जाचे दर निश्चित करून ते जिल्हास्तरावर पाठविणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.पूर्वी राज्यस्तरीय तांत्रिक समिती पीककर्जाचे दर निश्चित करून ते जिल्हास्तरावर पाठवत होती. मात्र, जिल्हानिहाय असलेल्या पीककर्जदरामध्ये तफावत राहात होती. त्या पार्श्वभूमीवर पीककर्ज दर निश्चितीसाठी जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्षपद हे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्याचा बदल मध्यंतरी नाबार्डमार्फत करण्यात आला होता. आता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती जिल्हास्तरावर पीककर्जाचे एकरी दर ठरवून ते राज्यस्तरीय समितीकडे पाठविणार आहे. त्याचे प्रत्यक्ष अवलोकन करून हे दर जिल्हास्तरावर ही समिती पाठवेल. त्यामुळे पीककर्जाच्या एकरी दरामध्ये असलेले असंतुलन दूर होण्यास मदत होणार आहे. थोडक्यात राज्यस्तरीय तांत्रिक समितीने यासंदर्भातील मॉनिटरिंग अधिक गांभीर्याने करण्याचा प्रयत्न या माध्यमातून चालविला आहे.विशेष म्हणजे २००८ मध्ये झालेल्या कर्जमाफीदरम्यान विदर्भ व मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रीतील शेतकऱ्यांना अधिक फायदा झाला होता. पीककर्ज दरामधील तफावत यास कारणीभूत असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले होते. त्यावेळी अभ्यासाअंती राज्यस्तरीय समितीने यासंदर्भात महत्त्वाची भूमिका निभावावी, असा सूर निघाला होता. त्यानुषंगाने नंतर कार्यवाही झाली होती. आता जिल्हास्तरावरील समितीने सुचविलेल्या पीककर्जाच्या दराचे ही समिती गांभीर्यपूर्वक अवलोकन करून अनुषांगिक दर हे जिल्हास्तरावर पाठवणार आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरील पीककर्ज वाटपाच्या एकरी दरातील तफावत दूर होण्यास मदत होईल. सोबतच शेतकऱ्यांना एकरी पीककर्ज अधिक मिळण्यास मदत होईल, असा उद्देश यामागे असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्याच्या तांत्रिक समितीची फेब्रुवारी महिन्यात पीककर्ज दरासंदर्भात बैठक झाली असून, त्यात सुचविण्यात आलेले दर राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे पाठविण्यात आले आहे. मार्चअखेर ते राज्यस्तरीय समितीकडून प्राप्त झाल्यानंतर एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष पीककर्ज वाटपास जिल्ह्यात प्रारंभ होईल, असे सुत्रांनी स्पष्ट केले. पीककर्ज दरामध्ये प्रसंगी दहा टक्के घट किंवा वाढ करण्याचेही अधिकार जिल्हास्तरीय तांत्रिक समितीला आहेत.  

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbuldhanaबुलडाणा