शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

दिव्यांगांचे बुलडाणा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:40 AM

दिव्यांगांसंदर्भातील १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी,  यासह विविध मागण्यांसाठी  जागतिक अपंगदिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी  प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देऊन काळा  दिवस पाळण्यात आला.

ठळक मुद्देजागतिक अपंगदिन : शासनाच्या विरोधात घोषणा देत पाळला काळा दिवसप्रहार जनशक्ती पक्षाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : दिव्यांगांसंदर्भातील १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी,  यासह विविध मागण्यांसाठी  जागतिक अपंगदिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी  प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देऊन काळा  दिवस पाळण्यात आला. शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. जयस्तंभ चौकातून प्रारंभी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. प्रहार जनशक्ती  पक्षाचे वैभवराजे मोहिते यांच्या मार्गदर्शनात प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे  पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा संजय इंगळे यांच्या नेतृत्वात  जयश्री गीते,  शिवनारायण पोफळकर, उपजिल्हा प्रमुख नीलेश गुजर, स्वराज भगत, रवी  पवार, सागर गुजर, नागेश बाजी, राजेश पुरी, शिवाजी परमेश्‍वर यांच्यासह  दिव्यांग बांधव, भगिनी या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर हा मोर्च  जिल्हा परिषदेसमोर धडकला. पोलिसांनी इमारतीत जाण्यास मज्जाव केल्याने  ठिय्या आंदोलन केले. जिल्हा समाजकल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी  आंदोलकांशी चर्चा केली. अपंग कृती आराखड्याची अंमलबजावणी  करण्याची मागणीही करण्यात आली.

दोषींवर कारवाई करणारमुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांनी ४ डिसेंबर रोजी दुपारी १२  वाजता जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांगांच्या मुद्यावर बैठक बोलावली आहे. त्या  बैठकीस अधिकार्‍यांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले असून,  आंदोलनकर्त्यांना तसे पत्रही दिले आहे. दिव्यांगांच्या मागण्या तत्काळ निकाली  काढण्यासंदर्भात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचेही  आश्‍वासन आंदोलकांना देण्यात आल्याने तूर्तास हे आंदोलन मागे घेण्यात  आले. 

टॅग्स :buldhana residenceबुलडाणा रेसीडन्सीzpजिल्हा परिषद