खामगाव: भरधाव बसची धडक लागून झालेल्या अपघातात नांदुरा येथील पद्माकर बोचरे (वय ४६) हे जागिच ठार झाले. ही घटना बुलढाणा बोथा मार्गावर ३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. पद्माकर बोचरे हे रोहणा येथे कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या एम.एच.२८-एएल.०९६४ या मोटारसायकलने येत होते. दरम्यान बुलडाणा- अकोला या एमएच.०६-८९०५ क्रमांकाच्या बसने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. हा अपघात रोहणा येथील सरकारी दवाखान्याजवळ घडला. बसचे चाक पंचर झाल्याने बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याचे समजते. मृतक पद्माकर बोचरे यांच्या पश्चात दिव्यांग पत्नी असल्याचे सुत्रांनी सांगितले.
बसची मोटारसायकलला धडक; दिव्यांग व्यक्ती ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 14:06 IST