शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस चिमुकलीची माता पोलिसांच्या ताब्यात!

By admin | Updated: March 1, 2016 01:25 IST

देऊळगावराजा बसस्थानकावर दहा दिवसांच्या मुलीला टाकून दिले होते. या घटनेची जालना येथे होणार डीएनए चाचणी.

देऊळगावराजा (बुलडाणा) : येथील बसस्थानकावर बेवारस दहा दिवसांच्या मुलीला टाकून दिल्याच्या घटनेची सर्वत्र चर्चा होत असताना पोलिसांच्या प्रयत्नाला गुप्त माहितीच्या आधारे यश प्राप्त झाले. घटनेच्या तिसर्‍या दिवशी देऊळगाव राजा पोलिसांनी त्या चिमुकलीच्या निर्दयी मातेला शोधून काढण्यात यश मिळविले आहे. संजीवनी तुकाराम भंडारे (वय २७)असे त्या मातेचे नाव आहे.जालना जिल्ह्यातील मारोती शिरपुरे यांची मुलगी संजीवनी हिचा विवाह नऊ वर्षांपूर्वी तुकाराम किसन भंडारे रा.भुतेगाव, जि.जालना याच्यासोबत झाला. या काळात भंडारे दाम्पत्याला प्रीती, ऐश्‍वर्या व अंजली या तीन मुली झाल्या. संजीवनी ही चवथ्यांदा गरोदर होती. १७ फेब्रुवारी २0१६ रोजी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात तिची प्रसूती होऊन मुलगी झाली. अडीच ते तीन वर्षांपूर्वी खडकपूर्णा धरणात मासेमारी करण्यासाठी भंडारे दाम्पत्य देऊळगावराजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथे आलेले असून, सध्या त्यांचे वास्तव्य गव्हाण येथेच आहे. प्रसूतीच्या दहा दिवसानंतर संजीवनी दहा दिवसाच्या नवजात मुलीला घेऊन बदनापूरवरून २७ फेब्रुवारीला निघून दुपारी देऊळगावराजा बसस्थानकावर उतरली. गर्दीचा फायदा घेत संजीवनीने नवजात मुलीला स्थानकामध्ये सोडून ती पसार झाली. बराच वेळ झाला ती परत न आल्याने व एकटेच नवजात बाळ बसस्थानकावरील प्रवाश्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघड झाला होता. यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.