शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'अटल भूजल' योजनेत मोताळा तालुक्याचा समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 16:23 IST

Buldhana News मोताळा तालुक्यातील चार पानलोटक्षेत्र आणि ६८ गावांना या योजनेचा फायदा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: भूजलाच्या अनियंत्रित उपसामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता केंद्र शासनाच्या अटल भूजल योजनेत राज्यातील १३ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याचा समावेश आहे. मोताळा तालुक्यातील चार पानलोटक्षेत्र आणि ६८ गावांना या योजनेचा फायदा होणार आहे. शासनाकडून याकरीता ९० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. राज्यामध्ये भूजल उपसाचे प्रमाण अधिक आहे. भूजल उपसामध्ये फळ बागायत तसेच कृषी क्षेत्राकरीता होणारा उपसा अधिक आहे. परिणामी, या क्षेत्रातील भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पाणलोटक्षेत्रे अतिशोषित, शोषित, अंशतः शोषित या वर्गवारींमध्ये समाविष्ट आहेत. अशा भागातील सिंचन विहीरीची क्षमता कमी झाल्यामुळे खोल विंधन विहिरींची संख्या वाढत आहे. याचा परिणाम भूजलाच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तेवर होत आहे. राज्यातील भूजल पुनर्भरणाची मर्यादा लक्षात घेता भूजल उपसावर मागणी आधारित व्यवस्थापनाव्दारे नियंत्रण आणणे अधिक उपयुक्त असल्याने राज्यात अटल भूजल योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने अटल भूजल योजना १३ जिल्ह्यामधील ७३ पाणलोट क्षेत्रातील १ हजार ३३९ ग्रामपंचायतीमधील १४४३ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये बुलडणा जिल्ह्यातून मोताळा तालुक्यातील चार पाणलोट क्षेत्रातील ६८ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. याकरीता आ. संजय गायकवाड यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे मागणी केली होती. त्याचा पाठपुराव केल्यानंतर केंद्र शासनाच्या या योजनेत बुलडाणा जिल्ह्यातुन मोताळा तालुक्याचा समावेश करण्यात आला. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना